पत्नीच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं होतं जीवन, मोलकरणीच्या नावावर केली कोटींची मालमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:21 IST
1 / 7झगमगाटाच्या दुनियेत काही कलाकारांचे आयुष्य पडद्यामागे खूपच वेदनादायक असते. हा किस्सा अशाच एका अभिनेत्याचा. जो पत्नीच्या निधनानंतर पूर्ण खचून गेला होता.2 / 7या अभिनेत्याचं नाव आहे तिरुमला सुंदर रंगनाथ. साउथ इंडस्ट्रीत विविध सिनेमांमध्ये खलनायकी भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून रंगनाथ यांची ओळख होती.3 / 7१९४६ साली जन्मलेल्या रंगनाथ यांनी १९६९ मध्ये 'बुद्धिमनथुडू' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे विविध सिनेमांमधून त्यांनी भूमिका गाजवल्या.4 / 7२००९ मध्ये दीर्घकाळ आजारी असलेल्या रंगनाथ यांच्या पत्नी चैतन्य यांचं निधन झालं. पत्नीच्या निधनाने रंगनाथ पूर्णपणे हादरले आणि ते नैराश्यात गेले. 5 / 7नैराश्यात गेलेल्या रंगनाथ यांनी २०१५ मध्ये त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. पोलिसांना त्यांच्या घरी एक सुसाइड नोट सापडली.6 / 7अभिनेते रंगनाथ यांनी आपली सर्व मालमत्ता त्यांच्या घरी बऱ्याच काळापासून घरकाम करत असलेली मोलकरीण मीनाक्षीच्या नावावर केली होती.7 / 7'मीनाक्षी आमच्या घरी काम करत होती. तिने माझ्या आई-वडिलांची त्यांच्या शेवटच्या काळात खूप काळजी घेतली. म्हणूनच वडिलांनी तिच्या नावावर संपत्ती केली.'', असा खुलासा रंगनाथ यांच्या मुलीने केला होता.