बॉलिवूडमध्ये सर्वात ‘रईस’ ठरला शाहरूख खान; वाचा कमाई करणाºया टॉप १० कलाकारांची यादी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-09-02T16:53:30+5:302018-06-27T20:14:27+5:30
२०१७ मध्ये सर्वाधिक कमाई करणाºया टॉप १० बॉलिवूड कलाकारांची यादी फोर्ब्स साप्ताहिकाने जाहीर केली आहे. यादीमध्ये केवळ दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा या दोनच अभिनेत्रींना स्थान मिळाले आहे. तर प्रथम क्रमांकावर बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याने त्याचे स्थान कायम ठेवले आहे. दीपिका १.१० कोटी डॉलरच्या कमाईसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर प्रियंका आणि दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग एक कोटी डॉलरच्या कमाईसह सातव्या क्रमांकावर आहेत.