लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेकीचीच आहे सगळीकडे चर्चा, तिच्या सौंदर्यावर फिदा झालेत चाहते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 19:28 IST2021-02-27T19:07:59+5:302021-02-27T19:28:15+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते.
स्वानंदी बेर्डेच्या इन्स्टाग्रामवर तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.
स्वानंदीचा भाऊ अभिनय बेर्डे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. त्याने ती सध्या काय करते, रंपाट आणि अशी ही आशिकी या चित्रपटात काम केले.
अभिनयने पदार्पण केल्यानंतर स्वानंदीच्या पदार्पणाची सगळेजण वाट पाहत होते. अखेर तीदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.
विशेष बाब म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकात काम करताना दिसणार आहे.
धनंजय माने इथंच राहतात.. या नाटकाद्वारे स्वानंदी तिच्या अभिनयप्रवासाला सुरुवात करत असून या नाटकात तिच्यासोबत तिची आई म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
स्वानंदी बेर्डे 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
स्वानंदीच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत.
स्वानंदी चित्रपटात येण्याआधीपासूनच तिच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
स्वानंदीच्या पहिल्या चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.