PHOTOS : शिवानी-विराजसच्या लग्नाचं शाही रिसेप्शन, मृणाल कुलकर्णी यांनी लेकासोबत लाडक्या सुनेलाही तयार केलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 10:26 AM2022-05-09T10:26:55+5:302022-05-09T11:35:26+5:30

Virajas Kulkarni, Shivani Rangole Wedding reception : दणक्यात पार पडलं शिवानी-विराजसचं लग्नाचं रिसेप्शन; पाहा, कोणकोणत्या कलाकारांनी लावली हजेरी

ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी आणि रांगोळे कुटुंबाची लाडकी कन्या शिवानी रांगोळे अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकले होते. नुकतंच त्यांच्या लग्नाचं शाही रिसेप्शन पार पडलं. या शाही रिसेप्शनचे फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत.

या रिसेप्शनची खास बात काय माहितीये? तर नववरवधूंना खुद्द मृणाल कुलकर्णी यांनी तयार केलं. मृणाल यांनी सूनबाईंना रिसेप्शनसाठी असं खास तयार केलं. यावेळी नव्या सुनेबद्दलचं प्रेम व कौतुक त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं.

लाडक्या लेकालाही आईनेच तयार केलं. यावेळी विराजस आईच्या प्रेमळ चेहऱ्याकडे एकटक बघत होता. आई आणि लेकाचा हा फोटो सगळ्यांनाच भावला.

सूनबाई रिसेप्शनसाठी तयार झाल्यावर मस्तपैकी फोटोसेशनही झालं. लाडक्या सुनबाईंनी सासूबाईंना अशी प्रेमळ मिठी मारली.

आईच्या डोळ्यांतील हे प्रेम बघा. पोराचं लग्न झालं, आज त्याचं रिसेप्शन आहे. तो नव्या आयुष्याची सुरूवात करतोय, याचं कौतुक मृणाल यांच्या डोळ्यांत वाचता येतं.

शिवानीने आईसोबतही पोझ दिली. रिसेप्शनवेळी शिवानी आईसोबत दिसली. या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंदही ओसंडून वाहत होता.

शिवानी व विराजस यांच्या रिसेप्शनला अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेत्री कविता लाड यांनी नववधू वराला आशीर्वाद दिलेत.

अभिनेत्री श्रेया बुगडे ही सुद्धा रिसेप्शनला हजर होती. काळ्या रंगाच्या साडीत श्रेया कमालीची सुंदर दिसत होती.

गौतमी देशपांडे ही विराजसची खास मैत्रिण. मालिकेत एकत्र काम करता करता दोघांची मैत्री झाली. मग मित्राच्या रिसेप्शनला गौतमी येणारच.

अभिनेत्री सानिया चौधरी ही सुद्धा या रिसेप्शनला हजर होती. तिच्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कॅमेऱ्यांना तिनं अशी मस्त पोझ दिली.

विराजस व शिवानीच्या रिसेप्शनला सर्वांनी धम्माल मज्जा मस्ती केली. हा फोटो याचाच पुरावा. गौतमी व सानिया यांनी अशी धम्माल मस्ती केली.

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे विराजस व शिवानीच्या रिसेप्शनला उपस्थित होते. त्यांनी कुलकर्णी व रांगोळे कुटुंबांसह नववधूवराला आशीर्वाद दिले.

हे शिवानीचे आई-बाबा तर विराजसचे सासू-सासरे. जावई बापूंनी सासू सासऱ्यांसोबत अशी झक्कास पोझ दिली.

रिसेप्शनमध्ये विराजस व शिवानी यांनी अशी रोमॅन्टिक पोझ दिली. या फोटोत दोघंही कमालीचे सुंदर दिसत आहेत.

रिशेप्शनमधील ही रांगोळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. या रांगोळीत शिवानी व विराजसचा फोटो व माझा होशील ना या मालिकेचं टायटल रेखाटण्यात आलं होतं.