iifa awards-2017 : आयफा अवार्डचे काही रंगीबेरंगी क्षण...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-17T10:04:08+5:302018-06-27T20:17:12+5:30

यंदाचा १८ वा आयफा अवार्डच्या रंगीबेरंगी सोहळ्याची सांगता झाली. पण अद्याप सोहळ्याची चर्चा संपलेली नाही. ग्रीन कार्पेटवरील बॉलिवूड सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज, आयफा सोहळा होस्ट करणारे सैफ अली खान, करण जोहरचे खिळवून ठेवणारे निवेदन, धम्मान परफॉर्मन्स आणि आयफा ट्रॉफी जिंकल्यानंतरचा विजयवीरांचा आनंदोत्सव हे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. अभिनेत्री आलिया भट्ट हिला आयफा अवार्ड सोहळ्यात बेस्ट अ‍ॅक्ट्रेसच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘उडता पंजाब’मधील अभिनयासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी स्टाईलिश आलियाने प्रत्येकाचे मनापासून आभार मानलेत.