बॉलिवूडमधील अभिनेत्रींचा हॉट ‘रेनी लूक’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-08-30T08:39:37+5:302018-06-27T20:14:50+5:30

मुंबईतील कालच्या पावसाने सगळ्यांची दाणादाण उडवली, हे खरे पण कितीही आभाळ फाटले तरी पाऊस हा कधीच ‘विलन’ बनू शकत नाही. रोमॅन्टिक मनात पाऊस हा नेहमीच ‘हिरो’ म्हणूनच आठवणीत असतो आणि असेल. रोमॅन्टिक मनाचे पावसाशी जसे नाते आहे, तसेच बॉलिवूडशीही आहेच. किंबहुना पाऊस आणि बॉलिवूड यांचे क्रेझी कनेक्शन आहे, असेच म्हणावे लागेल. तेव्हा पावसात थिरकणाºया सुंदर अभिनेत्रींच्या काही रोमॅन्टिक आठवणी, खास तुमच्यासाठी... प्रियांका चोप्रा ‘अभी मुझ में कहीं’ या ‘अग्निपथ’मधील रेनी साँगमध्ये प्रियांका चोप्रा थिरकताना दिसली होती. पिवळ्या साडीत ओलिचिंब झालेली प्रियांका तुम्ही एकदा बघायलाच हवी.