Zanai Bhosle : आशा भोसलेंच्या नातीपुढे जान्हवी, साराही फेल; PHOTO पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 04:05 PM2023-01-15T16:05:14+5:302023-01-15T16:12:47+5:30

Asha Bhosle granddaughter Zanai Bhosle : आपल्या सुमधूर आवाजाने जगभरातील रसिकांना भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले. पण सध्या चर्चा त्यांच्या नातीची आहे. होय, जनाई भोसले हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आपल्या सुमधूर आवाजाने जगभरातील रसिकांना भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले. पण सध्या चर्चा त्यांच्या नातीची आहे. होय, जनाई भोसले हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जनाई स्वत: एक गायिका आहे. मात्र सिंगींगपेक्षा अधिक तिच्या सौंदर्याची चर्चा आहे.

सौंदर्याच्या बाबतीत जनाई बाॅलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते. जान्हवी, सारा, अनन्याही तिच्यापुढे फिक्या पडतील.

जनाई सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे. इन्स्टावर ती रोज नवे फोटो शेअर करत असते.

मध्यंतरी जनाई अभिनयात येणार असल्याचीही चर्चा होती. लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं गेलं होतं.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या आगामी चित्रपटातून जनाई बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते अशी चर्चा रंगली होती.

जनाई संगीत क्षेत्रात फारसं नाव कमावू शकली नाही. मात्र, तरीदेखील सोशल मीडियावर ती कायमच चर्चेत असते. .

जनाईने देशातील पहिल्या ट्रान्सजेंडरसाठी गाणं गायलं होतं. त्यामुळे ती विशेष चर्चेत आली होती.

जनाईने संगीतासोबतच शबाना आझमी यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

जनाई सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटो शेअर करत असते.

जनाईला फिरण्याची प्रचंड आवड असून कोणत्याही नव्या ठिकाणाला भेट दिल्यावर ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.