वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही अभिनेत्री भाग्यश्री दिसते Bold & Beautiful, एकदा पाहाच हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 18:13 IST2022-03-12T18:00:37+5:302022-03-12T18:13:05+5:30
अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

भाग्यश्री हे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ती कबूतर जा जा म्हणणारी मैंने प्यार कियामधील निरागस तरूणी सुमन.
१९८९ साली हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा ती फक्त २० वर्षांची होती. त्यावेळी ती जेवढी सुंदर दिसायची तेवढीच ती आता पन्नाशी उलटलेली असतानाही दिसते.
मैनें प्यार कियानंतर ती फारशी चित्रपटात दिसली नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय असते.
सोशल मीडियावर ती वेगवेगळे फोटो आणि रिल्स शेअर करत असते.
काही दिवसांपूर्वी तिने ब्लू मोनोकिनीमधील बोल्ड फोटो शेअर केला होता.
भाग्यश्री वयाच्या ५३व्या वर्षीदेखील इतकी बोल्ड आणि सुंदर दिसते. यामागचे कारण म्हणजे फिटनेस. फिटनेसच्या बाबतीच खूपच जागरूक आहे.
भाग्यश्री नुकतीच राधे श्याम या चित्रपटात झळकली आहे.