‘प्यारवाली..’ अमेरिकेत प्रदर्शित
By Admin | Updated: October 31, 2014 00:08 IST2014-10-31T00:08:18+5:302014-10-31T00:08:18+5:30
स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर यांचा ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ हा चित्रपट सर्वत्र धडाकेबाज सुरू असताना तो अमेरिकेतही प्रदर्शित झाला आहे.

‘प्यारवाली..’ अमेरिकेत प्रदर्शित
स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर यांचा ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ हा चित्रपट सर्वत्र धडाकेबाज सुरू असताना तो अमेरिकेतही प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर एकाच वेळी भारतात आणि अमेरिकेतही प्रदर्शित झालेला हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. दुनियादारी नंतरचा संजय जाधवचा हा मोठा हिट ठरला असून देशभरासह विदेशातही सिनेमाला मोठी एन्ट्री मिळाली आहे. एखाद्या बॉलिवुड सिनेमाला साजेशी निर्मिती असलेल्या या चित्रपटासाठी एकाच वेळी अनेक मल्टीप्लेक्समध्ये जागा मिळाल्याने हा चित्रपट धमाकेदार गल्ला गोळा करत आहे. आता अमेरिकेतील मराठी भाषकांसाठी हा चित्रपट प्रदर्शित करून नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.