..तर परिणिती दिग्दर्शनातही
By Admin | Updated: July 31, 2014 05:07 IST2014-07-31T05:07:33+5:302014-07-31T05:07:33+5:30
अभिनेत्री बनवण्यापूर्वी परिणिती चोप्रा यशराज फिल्म्समध्ये पब्लिक रिलेशन हा विभाग सांभाळत होती;

..तर परिणिती दिग्दर्शनातही
अभिनेत्री बनवण्यापूर्वी परिणिती चोप्रा यशराज फिल्म्समध्ये पब्लिक रिलेशन हा विभाग सांभाळत होती; पण तिला चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीतही रस आहे. ‘दावत-ए-इश्क’ हा तिचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा प्रोमो शूट करताना परिणितीनेही प्रोडक्शन टीमची मदत केली. प्रोमो शूट करताना परिणितीने दिलेले सल्ले प्रोडक्शन टीमला खूपच आवडले, त्यांनी प्रोमोमध्ये तिने सांगितलेल्या बऱ्याचशा बाबींचा समावेश केला. परिणितीने या चित्रपटातील तिच्या डायलॉग्जमध्येही काही लाईन्स अॅड केल्या आहेत, तिचे हे काम दिग्दर्शकांनाही खूप आवडले. तिचा चित्रपटाबद्दलचा हा अॅप्रोच पाहून लवकरच ती दिग्दर्शन क्षेत्रात हात अजमावताना दिसली, तर नवल वाटायला नको.