‘सरकार ३’मध्ये अभि-ऐश नाही?
By Admin | Updated: August 24, 2016 02:05 IST2016-08-24T02:05:13+5:302016-08-24T02:05:13+5:30
ऐश्वर्या सरकारच्या दुसऱ्या भागात होती. पण आता तीदेखील ‘सरकार ३’मध्ये दिसणार नाही.

‘सरकार ३’मध्ये अभि-ऐश नाही?
राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार’ चित्रपटात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांनी काम केले होते. राजकीय विषयावर आधारित या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात मात्र अभिषेक आणि ऐश्वर्या दिसणार नाहीयेत. ऐश्वर्या सरकारच्या दुसऱ्या भागात होती. पण आता तीदेखील ‘सरकार ३’मध्ये दिसणार नाही. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी टिष्ट्वटरवर पोस्ट केले की, ‘सरकार ३’चा फर्स्ट लूक २६ आॅगस्टला लाँच होईल. अभिषेक आणि ऐश्वर्या हे दोघेही ‘सरकार’च्या तिसऱ्या भागात नसतील. मात्र अमिताभ बच्चन हे चित्रपटाच्या तिसऱ्या भागात असतील. त्यांचा फर्स्ट लूक २६ आॅगस्टला रीलीज होईल.