स्वातंत्र्यपूर्व काळ दाखविण्यासाठी ‘निळकंठ मास्तर’ टीमची पायपीट

By Admin | Updated: August 6, 2015 00:10 IST2015-08-06T00:10:06+5:302015-08-06T00:10:06+5:30

ऐतिहासिक काळ दाखवायचा म्हणजे सोपे काम नाही. भाषा, भाषेचा लहेजा हे तर वेगळेच; पण त्या कालखंडातील वाहने, वेशभूषा आणि केशभूषा दाखविणे मोठे जिकिरीचे काम असते.

'Nilkantha Master' team's footpath to show the pre-independence period | स्वातंत्र्यपूर्व काळ दाखविण्यासाठी ‘निळकंठ मास्तर’ टीमची पायपीट

स्वातंत्र्यपूर्व काळ दाखविण्यासाठी ‘निळकंठ मास्तर’ टीमची पायपीट

ऐतिहासिक काळ दाखवायचा म्हणजे सोपे काम नाही. भाषा, भाषेचा लहेजा हे तर वेगळेच; पण त्या कालखंडातील वाहने, वेशभूषा आणि केशभूषा दाखविणे मोठे जिकिरीचे काम असते. सगळ्या साहित्याची जमवाजमव करणे आणि त्यातील ‘कंटिन्युटी’ टिकविणे हे मोठे आव्हान असते. ‘निळकंठ मास्तर’ या शुक्रवारपासून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने यासाठी प्रयत्न केले आणि हुबेहूब स्वातंत्र्यपूर्व काळ त्यातील सगळ्या भव्यतेसह उभा राहिला.
प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हे प्रयोगशील दिग्दर्शक. चित्रपटात अधिकाधिक परफेक्शन यावे, असा त्यांचा प्रयत्न असतो. ‘निळकंठ मास्तर’साठी त्यांनी इतिहासाच्या अभ्यासाबरोबरच साहित्याची जमवाजमव करण्यासाठी खूप प्रयत्न केले. या चित्रपटातील स्त्रियांसाठी आणि विशेषत: नेहा महाजनने साकारलेल्या यशोदासाठी खूप जुन्या, फाटक्या साड्यांची गरज होती. अशा साड्या बाजारात मिळणे तर शक्य नव्हते. त्यामुळे अशा साड्यांसाठी गावोगाव हिंडून तेथील स्त्रियांकडून वापरत असलेल्या साड्या मिळवाव्या लागल्या. विशेष म्हणजे, एका शॉटमध्ये यशोदासाठी फाटकी साडी लागणार होती, तेव्हा चित्रपटाचे आर्ट डिरेक्टर संतोष संखड यांनी गावातील एका आजीचा चक्क एक फाटका ब्लाऊज-साडी घेतली आणि नेसायला दिल्याचे नेहाने सांगितले.
पूजा सावंतने साकारलेल्या इंदूने नेसलेली मांजरपाट साडी सहजच उपलब्ध झाली. कारण ही साडी तुरुंगात असलेल्या स्त्रिया वापरतात. त्यामुळे मांजरपाट साडीचा तागाच मिळाल्याने फारशी अडचण आली नाही. ते तुरुंगातील स्त्रियांसाठी वापरत असल्याने सहज उपलब्ध झाले. इतकेच नाही तर शूटिंगच्या वेळी हजार-बाराशेचा मॉब दाखवायला लागल्याने सतत त्या साड्या आणि त्याचे ब्लाऊज शिवण्यासाठी जिथे शूटिंग असेल तिथे टेलरनाही बसवले जायचे आणि गरज पडेल तसे कपडे शिवून दिले जायचे. कोणत्याही विषयाला वास्तववादी लूक देण्यासाठी सामग्रीची आवश्यकता असते खरी; पण त्यासाठी अशा पद्धतीने धडपड केली जात असेल, तर ती निश्चितच दर्जेदार होणारच.

Web Title: 'Nilkantha Master' team's footpath to show the pre-independence period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.