‘निळकंठ मास्तर’चा धूमधडाक्यात प्रीमियर

By Admin | Updated: August 8, 2015 23:54 IST2015-08-08T23:54:42+5:302015-08-08T23:54:42+5:30

ढोलताशाचा गजर... कलाकारांची मांदियाळी... सेलीब्रिटींना पाहण्यासाठी उडालेली झुंबड... कलाकारांना ढोल वाजविण्याचा अनावर झालेला मोह... अशा उत्साही वातावरणात गजेंद्र अहिरे दिग्दर्शित

'Neelkanth Master' premiere in Phumahadak | ‘निळकंठ मास्तर’चा धूमधडाक्यात प्रीमियर

‘निळकंठ मास्तर’चा धूमधडाक्यात प्रीमियर

ढोलताशाचा गजर... कलाकारांची मांदियाळी... सेलीब्रिटींना पाहण्यासाठी उडालेली झुंबड... कलाकारांना ढोल वाजविण्याचा अनावर झालेला मोह... अशा उत्साही वातावरणात गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘निळकंठ मास्तर’ चित्रपटाचा प्रीमियर शो मोठ्या उत्साहात शुक्रवारी झाला.
‘लोकमत सीएनक्स प्रीमियर’ उपक्रमांतर्गत हा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, अभिनेता ओंकार गोवर्धन, अभिनेत्री पूजा सावंत, नेहा महाजन, निर्माते अजय नाईक यांच्यासह अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि असंख्य रसिकांची उपस्थिती हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. रुद्रगर्जनेने केलेल्या ढोलताशाच्या निनादाने संपूर्ण आसमंतात उत्साह संचारला. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि पूजा सावंत यांनीही ढोल वाजवण्याचा आनंद लुटला़

सीएनएक्स ही पुरवणी खूपच आकर्षक आहे. त्यातल्या बातम्याही खूप वेगळ्या असतात. त्यातही मुंबईपेक्षा पुण्याचा क्राउड हा खूपच वेगळा आहे. त्यांना ही पुरवणी निश्चितच आवडेल आणि सीएनएक्स पुरवणी नक्कीच खूप पॉप्युलर होईल, असा माझा विश्वास आहे.
- गजेंद्र अहिरे, दिग्दर्शक

मराठी चित्रपट, मालिका किंवा नाटकांना प्रमोशनची खूप गरज असते. लोकमतमुळे इंडस्ट्रीतल्या घडामोडी शहरांपुरत्या मर्यादित न राहता लहान-लहान गावांतही पोहोचू शकत आहेत.
- अजय नाईक, दिग्दर्शक

सीएनएक्स पुरवणी माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. कारण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधल्या गोष्टी लोकांना माहीत होणं गरजेचं असतं. त्यामुळे त्यात कलाकारांच्या मुलाखती, गप्पा आल्या तर ते रसिकांना माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी उपयोगाचं असतं. - ओंकार गोवर्धन, अभिनेता

या पुरवणीमुळे नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रांतील कलाकारांना खूप मोठा पाठिंबा मिळेल. यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळणं गरजेचं असतं आणि ती गरज या पुरवणीमुळे पूर्ण होत आहे.
- पूजा सावंत, अभिनेत्री

मराठी चित्रपटात सध्या खूप नवनवीन प्रयोग केले जातायत, जे यशस्वीही होत आहेत. पण ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं चांगलं काम लोकमत सीएनएक्स करीत आहे, याचा आनंद आहे.
- नेहा महाजन, अभिनेत्री

मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी लोकमतने सुरू केलेला हा उपक्रम अभिनव आहे़ यामुळे मराठी चित्रपटांना लोकाश्रय मिळण्यास मदत होणार आहे़ चित्रपट सर्व स्तरांपर्यंत पोहोचतील़
- मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री


आगामी चित्रपटांनाही लोकमत सीएनएक्सने असाच पाठिंबा द्यावा. मराठी चित्रपटांना भारतीय सिनेमाचा जनक म्हटले जाते. त्याला या उपक्रमाने न्याय मिळत आहे. - अमित गायकवाड

कलाकारांच्या उत्तम, कसदार अभिनयाने चित्रपटाला मजा आणली. कुठेही यातील कलाकार नवीन आहेत, असं वाटलं नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तम. चित्रपट चांगला.
- हर्षवर्धन मुंडले

स्क्रीन प्ले, संगीत व कलाकारांचा अभिनय या सगळ्यांनी चित्रपटाला वेगळीच रंगत आणली. फक्त स्वातंत्र्य लढा, चळवळ न दाखवता सामान्य माणसाची परिस्थिती दाखवली ते आवडलं़ - मृण्मयी सुभेदार

मला वाटतं, प्रत्येकानं हा चित्रपट पाहावा. मनोरंजन म्हणून नाही, तर सामान्यांच्या मुक्ततेसाठी क्रांतिकारकांनी काय हालअपेष्टा सहन केल्या, हे आपल्याला कळायलाच हवं़
- आरती भोसले

क्रांतिकारकांच्या भावना या चित्रपटात दाखवण्यात आल्या. रोजचे जीवन किती कठीण होते? निरपराध घरच्यांना काय सोसावे लागले? याबरोबर तो काळ हुबेहूब पडद्यावर उभा राहतो.
-अभिषेक सुभेदार

Web Title: 'Neelkanth Master' premiere in Phumahadak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.