नजरेला हवी होती दूरदृष्टी !

By Admin | Updated: November 7, 2015 08:55 IST2015-11-07T08:54:49+5:302015-11-07T08:55:08+5:30

चित्रपट सादर करताना वेगळी दृष्टी असावी लागते, जेणोकरून चित्रपट सर्वच अंगाने परिपूर्ण होऊ शकेल. ‘नजर’ या चित्रपटाच्या कर्त्याकडे ही दृष्टी आहे खरी; परंतु तिचा उपयोग मात्र हात राखूनच केला गेला आहे.

Need to see the vision! | नजरेला हवी होती दूरदृष्टी !

नजरेला हवी होती दूरदृष्टी !

>- मराठी चित्रपट : राज चिंचणकर
 
चित्रपट सादर करताना वेगळी दृष्टी असावी लागते, जेणोकरून चित्रपट सर्वच अंगाने परिपूर्ण होऊ शकेल. ‘नजर’ या चित्रपटाच्या कर्त्याकडे ही दृष्टी आहे खरी; परंतु तिचा उपयोग मात्र हात राखूनच केला गेला आहे. या नजरेला दूरदृष्टीची साथ असती, तर एका वेगळ्या वाटेवरचा चित्रपट तयार होऊ शकला असता. तसे झालेले नाही; पण ही कथा ठसवण्याचा आटोकाट प्रय} मात्र या चित्रपटकत्र्यानी केला आहे.
गावात वडिलांसोबत राहणारी फुलवा दृष्टिहीन आहे; परंतु ती कुणावरही अवलंबून नाही. या गावात पुष्कर हा तरुण नवा तलाठी म्हणून रुजू होतो. स्वयंपाक करणा:या बाईची पुष्करला आवश्यकता असल्याने फुलवा रोज त्याच्या घरी स्वयंपाक बनवायला जात राहते. फुलवाच्या तो प्रेमात पडतो आणि एका नाजूक क्षणी त्यांच्यातली जवळीक सगळ्या सीमा पार करते. तिला लग्नाचे वचन देऊन पुष्कर शहरात जातो आणि इथे फुलवा त्याच्या परतण्याकडे डोळे लावून बसते. बराच काळ लोटला तरी पुष्कर गावाकडे फिरकत नाही, त्यामुळे फुलवाचे वडील त्याचा शोध घेत शहरात येतात. मात्र या दोघांची भेट झाल्यावर पुष्कर सरळ हात वर करतो आणि इथून कथेला वेगळे वळण मिळते.
या कथेचे लेखन व दिग्दर्शन गोरख जोगदंडे यांनी केले आहे आणि त्यांच्यासह हरी कोकरे यांनी पटकथा लिहिली आहे. कथेत तसे नावीन्य नाही आणि पुढे काय होणार याचा अंदाज आधीच लागत असल्याने कथेतली उत्सुकताही कमी होत जाते. कथेचे सरळ सरळ दोन भाग पडले आहेत. मध्यंतरापूर्वी फुलवाच्या गावातल्या जीवनात चित्रपट अधिक रेंगाळतो. याला कात्री लावणो आवश्यक होते. हा भाग थेट सत्तरच्या दशकातल्या चित्रपटांची आठवण करून देतो आणि हा चित्रपट जुन्या पठडीतला वाटत राहतो. उत्तरार्धात मात्र कथा वळण घेते आणि या भागात बरेच काही घडते. त्यामुळे चित्रपटाचा दुसरा टप्पा थोडा वेगवान झाला आहे; पण हाच वेग पूर्वार्धात ठेवणो गरजेचे होते.
नायकाच्या मनातले किल्मिष दाखवण्यासाठी सुरुवातीलाच योजलेले प्रसंग अत्यंत खालच्या पातळीवरचे वाटतात. इथे रेंगाळणारा कॅमेराही आगाऊ वाटतो. नायकाचे असे रूप टाळण्याचा प्रय} आवजरून करायला हवा होता. तसे न झाल्याने हा नायक आधीच खलनायक बनून जातो. वास्तविक ही बाब बरीच पुढे उघड होणो गरजेचे होते. काही प्रसंग फक्त चित्त वेधण्यासाठी यात घेतले आहेत; पण केवळ उथळपणासाठीच त्यांचे प्रयोजन असल्याने ते चित्रपटाला मारक ठरतात. अबला असलेली नायिका नंतर सबला होत दुर्गावतार धारण करते, याची बीजेही कथेत आधीच एन्ट्री करतात. त्यामुळे उत्कंठा ताणली जाण्यावर त्याचा परिणाम होतो. सन्ना मोरे याचे संवाद चित्रपटाच्या जातकुळीशी इमान राखतात; पण त्यांना पटकथेची साथ मिळाली असती तर ते अधिक उठावदार झाले असते. चित्रपटात तेजा देवकरने अभिनयाची बाजू तोलून धरत संपूर्ण चित्रपटाचा तोल सांभाळला आहे. ग्रामीण बाजाच्या फुलवापासून आमूलाग्र बदल झालेल्या शहरी फुलवार्पयतचा प्रवास तिने नेटका केला आहे आणि ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. पुष्करची भूमिका रंगवणा:या स्वप्निल राजशेखरने त्याची व्यक्तिरेखा ब:यापैकी उभी करण्याचा प्रय} केला आहे. रवी पटवर्धन, अरुण नलावडे, विजय गोखले यांना फारसा वाव नाही. एकूणच या चित्रपटाला अधिक डोळसपणो ट्रीटमेंट दिली गेली असती, तर ही नजर दृष्टीच्या टप्प्यात आली असती ! 
 
* कथेत तसे नावीन्य नाही आणि पुढे काय होणार याचा अंदाज आधीच लागत असल्याने कथेतली उत्सुकताही कमी होत जाते. कथेचे सरळ सरळ दोन भाग पडले आहेत. मध्यंतरापूर्वी फुलवाच्या गावातल्या जीवनात चित्रपट अधिक रेंगाळतो. याला कात्री लावणे आवश्यक होते. हा भाग थेट सत्तरच्या दशकातल्या चित्रपटांची आठवण करून देतो.
 

Web Title: Need to see the vision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.