माङो आयुष्य रिअॅलिटी शो बनले आहे
By Admin | Updated: June 26, 2014 22:39 IST2014-06-26T22:39:32+5:302014-06-26T22:39:32+5:30
सध्या वर्तमानपत्रंमध्ये येत असलेल्या बातम्यांमुळे रणबीर कपूर खूपच नाराज आहे. त्याची ही नाराजी त्याने एका कार्यक्रमात व्यक्त केली.

माङो आयुष्य रिअॅलिटी शो बनले आहे
>सध्या वर्तमानपत्रंमध्ये येत असलेल्या बातम्यांमुळे रणबीर कपूर खूपच नाराज आहे. त्याची ही नाराजी त्याने एका कार्यक्रमात व्यक्त केली. अभिनयाऐवजी रणबीर कपूरची चर्चा त्याचे अफेअर्स आणि आई-वडिलांबाबत जास्त होत असते. रणबीरच्या माता-पित्यांना कॅटरिना आवडत नाही, त्यामुळे त्यांचे घर सोडून रणबीर कॅटसोबत दुसरीकडे राहायला जाणार आहे किंवा त्याने नवे घर घेतले असल्याचेही म्हटले जाते. रणबीर या बातम्यांनी दु:खी आहे. स्वत:ला झालेल्या दु:खाबाबत रणबीर फारसा विचार करीत नाही; पण त्याच्या आई-वडिलांना या बातम्या वाचून जे दु:ख झाले त्याबाबत वाईट वाटत असल्याचे तो म्हणाला.