मराठमोळ्या संस्कृतीला हिंदीचा तडका..
By Admin | Updated: July 12, 2014 22:41 IST2014-07-12T22:41:50+5:302014-07-12T22:41:50+5:30
मराठी चित्रपट केवळ एकटय़ाच्या बळावर खेचून नेईल असा अभिनेता मराठीत नाही, असा समज आहे. विशेषत: हिंदी चित्रपटांशी तुलना करता ही बाब अधोरेखित होते.

मराठमोळ्या संस्कृतीला हिंदीचा तडका..
मराठी चित्रपट
राज चिंचणकर
मराठी चित्रपट केवळ एकटय़ाच्या बळावर खेचून नेईल असा अभिनेता मराठीत नाही, असा समज आहे. विशेषत: हिंदी चित्रपटांशी तुलना करता ही बाब अधोरेखित होते. हा समज मोडून काढण्यासाठी रितेश देशमुख याने कंबर कसून मराठी चित्रपटातल्या पदार्पणातच ‘लय भारी’ उडी मारली. त्याने घेतलेली ही झेप एकूणच त्याच्यासाठी प्रभावी असली, तरी ही झेप या चित्रपटाला ख:या अर्थाने अटकेपार घेऊन जाण्यासाठी काहीशी कमी पडली आहे.
हिंदी चित्रपटासारखा एक भव्यदिव्य असा चित्रपट मराठीत करायचा आणि तोही पूर्णत: कमर्शियल हेतू ठेवून, हा अट्टाहास ‘लय भारी’च्यामागे असल्याचे स्पष्ट दिसते. परंतु यासाठी हिंदी चित्रपटाचे मराठीकरण करण्यात धन्यता मानली गेली आहे आणि हा चित्रपट केवळ रितेशपुरताच उरल्याचे वास्तव अधिक गडद होत गेले आहे.
मनोरंजनासाठी जे जे काही लागते ते सर्व या चित्रपटात आहे. मारझोड, विनोदी मसाला, खलनायक, पुत्रप्रेम, संघर्ष हे तर यात आहेच; पण मराठीत एक हीरो देण्याचा प्रय}ही या चित्रपटाने केला आहे. एखादा हिंदी मसालेदार चित्रपट पाहिल्याचाच अनुभव गाठीशी जमा होत जातो. परिणामी भाषा अस्सल मराठी, पण पडद्यावरची अदाकारी मात्र हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटाला शोभेल अशी, असे या चित्रपटाबाबत घडलेले दिसते. जन्मत:च जुळ्या भावांची होणारी ताटातूट हा तर हिंदी चित्रपटांचा आत्माच आणि हीच गोष्ट ‘लय भारी’चा पाया आहे. गावात समाजमान्य प्रस्थ असलेल्या प्रतापसिंह आणि सुमित्रदेवी यांचा मुलगा अभयसिंह परदेशातून परतलाय. प्रतापसिंह यांचे त्यांच्या भावाशी वैर आणि त्यांचा संग्राम हा मुलगा म्हणजे याचा कळस! अभयसिंह आणि संग्राम यांच्यात खटके उडाल्यावर क्रूरतेची सीमा गाठत संग्राम या पितापुत्रंना संपवतो आणि त्यानंतर धडाकेबाज एन्ट्री होते ती ‘माऊली’ची! गोष्टीला इथून वेगळे वळण मिळते आणि लय भारीपणा ठळकपणो समोर येतो.
रितेशने हा सामना एकहाती तोलला आहे आणि सबकुछ रितेश या चित्रपटाला भारी पडला आहे. एक भन्नाट हीरो मराठी रसिकांना पाहायला मिळेल याची खात्री मात्र तो देतो. चित्रपटातले बरेच प्रसंग ओळखीचे वाटतात आणि नकळत त्यांची तुलना हिंदी कमर्शियल चित्रपटांबरोबर होत जाते. माऊली पंढरपुरात वाढतो, म्हणून त्याला विठ्ठल, वारकरी दिंडय़ांची साथ आहे. परंतु माऊलीचे वर्तन विरोधाभास दर्शविते. अर्थात चित्रपट कमर्शियल आहे असे म्हटल्यावर ती त्याचीच गरज बनून जाते. जनतेचा तारणहार ही भूमिका साकारण्यात रितेशने प्रचंड भाव खाल्ला आहे. परिणामी रसिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यात तो यशस्वी होतो. शरद केळकरचा संग्राम अस्सल खलनायक वाटतो़ संजय खापरे, तन्वी आझमी, उदय टिकेकर यांच्या भूमिका ठीक़ राधिका आपटे व अदिती पोहनकर या नायिकांना फारसा वाव नाही. चित्रपटातली गाणी जमून आली आहेत. संजय मेमाणो यांचा कॅमेरा उत्तम फिरला आहे. दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी पूर्णत: व्यावसायिकपणो चित्रपट सादर केला आहे. साहजिकच मनाला पडणा:या प्रश्नांची उत्तरे न शोधता हा चित्रपट पाहिल्यास तो ‘लय भारी’ वाटू शकतो.