महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा घेण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामती येथे जात होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी बारामतीविमानतळावर उतरताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य शोकाकूल झालं आहे.
गायक उत्कर्ष शिंदे याने अजित पवार यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. ""राष्ट्रवादी पुन्हा”, “आपला दादा लय रुबाबदार“ ते असंख्य लाईव्ह कार्यक्रम परफॉर्म करताना जेव्हा जेव्हा अजित दादा समोर असायचे तेव्हा वेगळाच माहोल असायचा. त्यांच्यासमोर अशा कैक गाण्यांना सादर करताना नेहमी वेगळी ऊर्जा होती."
"दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील; सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू, पोरकेपणाची भावना"
"करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट
"बारामती काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे शिंदेशाही परिवाराचा कार्यक्रम होता. माझे वडील गायक आनंद शिंदे कार्यक्रमानंतर तिथेच रेस्ट हाऊसला थांबले. रेस्ट हाऊसला पाहटे पहाटे पोलिससांचा गाड्यांचा ताफा आला. ताफा होता माननीय अजित दादा पवार यांचा. आनंद भाऊ तुम्ही बारामतीत आहात कळालं म्हणून भेटायला स्वतः आलो. झोप डिस्टर्ब झाली असेल तुमची माझ्या येण्याने त्याबदल सॉरी…"
"प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले..."; जितेंद्र आव्हाड भावुक
"मतभेद होते पण आदर कायम..."; अजित पवारांच्या निधनाने प्रियंका चतुर्वेदींना अश्रू अनावर
"अहो अजित दादा कॉल केला असता तर मी आलो नसतो का? डॅडने हे बोलताच... ते म्हणाले राजकारणी अजितदादाने बोलावला असतं तर तुम्ही आला असतातच पण मी इथे माझ्या आवडत्या गायकाला माझ्या भावाला भेटायला आलोय आणि आनंदला भेटण्याचा आनंद मी गमवायचा होता का? नियोजित कार्यक्रम आहेत म्हटलं आधी तुम्हाला भेटून जावं…. चला येतो काही लागल्यास कॉल करा…अस म्हणत दादा निघाले.. अशा कैक आठवणी पवार परिवारासोबतच्या शिंदे परिवार कधीच विसरणार नाही" असं उत्कर्ष शिंदेने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Web Summary : Utkarsh Shinde shared memories of Ajit Pawar's humility. He recalled Pawar's surprise visit to his father, Anand Shinde, at a Baramati rest house, showcasing Pawar's personal touch and respect for artists.
Web Summary : उत्कर्ष शिंदे ने अजित पवार की विनम्रता के संस्मरण साझा किए। उन्होंने बारामती के एक विश्राम गृह में अपने पिता आनंद शिंदे से पवार की अप्रत्याशित मुलाकात को याद किया, जिसमें पवार का व्यक्तिगत स्पर्श और कलाकारों के प्रति सम्मान झलकता है।