Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम 'सावत्या'ची बायको दिसायला खूप सुंदर, अभिनेत्याने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:03 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता रोहित मानेच्या पत्नीला पाहिलंय का? बायकोच्या वाढदिवशी अभिनेत्याने शेअर केला फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेच्या बायकोचा वाढदिवस आहे. रोहितला हास्यजत्रेत सर्व 'सावत्या' म्हणून ओळखतात. रोहितने बायकोच्या वाढदिवशी इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट लिहून तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितची पत्नीचं नाव श्रद्धा असून ती सुद्धा दिसायला सुंदर आहे. श्रद्धासोबत रोमँटिक फोटो पोस्ट करुन रोहितने खास शब्दांमध्ये त्याचं प्रेम व्यक्त केलंय. 

रोहित लिहितो, ''तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि तू ज्या ज्या गोष्टींमध्ये प्रयत्न करशील त्यात तुला यश मिळो. १६ सप्टेंबर ही तारीख तुझ्या इतकीच माझ्या आयुष्यातसुद्धा खूप जास्त खास आहे. अशीच कायम सोबत रहा माझ्या. तू माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये मला सपोर्ट केलाय. तुझी साथ नसेल तर मी काहीच नाहीये. मी मीच नाहीये... तू माझं चांगलं-वाईट सगळं वागणं सहन करतेस. सॉरी त्या गोष्टींसाठी ज्यामुळे तुला माझा त्रास होतो आणि थँक यू की तू कधीही कंप्लेंट न करता कायम मला समजून घेतेस. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि ते असंच कायम राहील यात कधीही काहीच बदल होणार नाही.''

''मी तुला कायम असंच हॅपी ठेवेन आणि तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करेन. मला माहीत आहे मी कधी कधी खूप वेड्यासारखं वागतो, चुकतो पण मला माहीत आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तूच मला समजून घेऊ शकतेस. आपल्या आयुष्यात तुझ्याशिवाय माझी कोणतीच गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही, कारण तू आहेस माझ्या लाईफमध्ये म्हणून मी कम्प्लीट फील करतो.''

''तू माझ्यासोबत अशीच रहा, मी कायम असाच पूर्ण असेन. माझा मूर्खपणा, माझे येडेचाळे, माझा थोडासा त्रास सहन करण्याची ताकद देव तुला कायम देवो कारण मी हे कायम करत राहणार. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी इतक्या कमी शब्दात नाही सांगू शकत. थँक यू फॉर एव्हरीथिंग अँड सॉरी फॉर माय मिस्टेक्स. आय लव्ह यू एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. खूप खूप खूप प्रेम.. हॅपी बर्थडे बायको...''

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजनटिव्ही कलाकारलग्नरिलेशनशिप