झलक ‘बाजी’ची
By Admin | Updated: October 31, 2014 00:06 IST2014-10-31T00:06:39+5:302014-10-31T00:06:39+5:30
श्रेयस तळपदेची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बाजी’ची पहिली झलक प्रदर्शित झाली असून आतापासून या चित्रपटाबद्दल चर्चा रंगू लागली आहे.

झलक ‘बाजी’ची
श्रेयस तळपदेची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बाजी’ची पहिली झलक प्रदर्शित झाली असून आतापासून या चित्रपटाबद्दल चर्चा रंगू लागली आहे. अॅक्शन आणि रोमान्सचा तडका या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे. सामान्य माणसाच्या संरक्षणासाठी शस्त्र उचलणा:या सुपरहिरोची ही कथा आहे. कोकणच्या निसर्ग सौंदर्याची उधळण केलेली असल्याने त्याचे टिझर्स आतापासूनच सोशल नेटवर्कीगवर धमाल करीत आहेत. या चित्रपटाची शुटींग अद्याप सुरू असून फेब्रुवारी 2क्15 च्या सुरूवातीला तो प्रदर्शित
होण्याची शक्यता आहे. सुमारे 7 वर्षाच्या गॅपनंतर श्रेयस कमबॅक करीत आहे, यात
त्याच्या सोबत अमृता खानविलकर व जितेंद्र जोशी यांच्याही भूमिका आहेत. ‘पुणो 52’चा दिग्दर्शक निखिल महाजन हा दिग्दर्शन करीत आहे.