‘आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात’

By Admin | Updated: March 29, 2017 05:00 IST2017-03-29T05:00:48+5:302017-03-29T05:00:48+5:30

कही तो होगा,कुसुम,क्यों की सास भी कभी बहू थी,दिया और बाती हम यांसारख्या मालिकांमध्ये इजाज खानने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. तो पुन्हा एकदा

'Likes to play a challenging role' | ‘आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात’

‘आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात’

- Geetanjali Ambre -
कही तो होगा,कुसुम,क्यों की सास भी कभी बहू थी,दिया और बाती हम यांसारख्या मालिकांमध्ये इजाज खानने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करायला तयार झाला आहे. ‘मोह मोह के धागे’ या मालिकेद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकेत इजाजचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.

तुझ्या या मालिकेतील भूमिकेविषयी काय सांगशील?

एका सरपंचाची आणि एका शहरातील मुलीची ही प्रेमकथा. या मालिकेत मी सरपंचाची अतिशय वेगळी भूमिका साकारत आहे. या माणसाला तरुणपणातच अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या आहेत. सामाजिक बंधनांना झुगारून देणारे हे जोडपे आहे.

सरपंचाची भूमिका साकारण्यासाठी काय विशेष मेहनत घेतली आहेस?
गावातील पुरुष हे कधीच बारीक नसतात. ते नेहमीच पिळदार असतात, असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे होते. त्यामुळे मी 10 किलो वजन वाढवले. तिकडची भाषा शिकण्यासाठी मी जवळपास 3 आठवडे गुजरातमधील एका गावामध्ये थांबलो होतो. तिकडच्या लोकांची जीवनशैली समजण्यासाठी मी तिकडे राहिलो होता. मी तिथे ट्रॅक्टर चालवायलाही शिकलो. या सगळ्याचा बराच फायदा मला माझी भूमिका साकारताना झाला. तसेच, मला गोड खायला खूप आवडते. जिलेबी, गुलाबजाम, चॉकलेट यांचा तर मी फॅन आहे. पूर्वी मला या गोष्टी खाताना अनेकवेळा विचार करावा लागत असे. पण, या मालिकेच्या निमित्ताने आता माझ्या आवडत्या पदार्थांवर आनंदाने ताव मारतो.


गेल्या काही दिवसांपासून तू टीव्ही स्क्रिनपासून दूर दिसलास, या मागचे कारण काय?
हो गेल्या काही दिवसांपासून मी टीव्ही स्क्रिनपासून लांब होतो. त्याचे कारण असे की, वयाच्या ४०व्या वर्षी आपण जे काम करतो त्यात उत्सुकता आणि आवड असली पाहिजे, फक्त पैसे कमवण्यासाठी काम करायचे, भले मग ते तुम्हाला आवडले असो वा नसो असे करणे मला पटत नाही. यामुळे मी जरा लांब होतो. तसेच त्यादरम्यान मी माझ्या वडिलांसह जास्तीत जास्त वेळ घालवला.

तुझा ड्रीम रोल कोणता ?

मला नेहमीच काही तरी नवीन आणि चॅलेजिंग करायला आवडते. मला अशा भूमिका करायला आवडतात ज्याच्या माध्यामातून मी प्रेक्षकांना बांधून ठेवू शकतो. समाज प्रबोधन देणारे चित्रपट आणि मालिका मला करायला आवडतात.

Web Title: 'Likes to play a challenging role'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.