रितेशमुळे ‘बँकचोर’ लेट!
By Admin | Updated: July 17, 2015 04:54 IST2015-07-17T04:54:21+5:302015-07-17T04:54:21+5:30
बॉ लीवूडमधील मराठी अभिनेता रितेश देशमुखचे शेड्युल सध्या जास्त बिझी आहे. त्यामुळे ‘बँक चोर’ चित्रपटाला उशीर होत आहे. यशराज बॅनरखालील ‘बँक चोर’च्या प्रदर्शित

रितेशमुळे ‘बँकचोर’ लेट!
बॉ लीवूडमधील मराठी अभिनेता रितेश देशमुखचे शेड्युल सध्या जास्त बिझी आहे. त्यामुळे ‘बँक चोर’ चित्रपटाला उशीर होत
आहे. यशराज बॅनरखालील ‘बँक चोर’च्या प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रितेश देशमुखच्या तारखा बुक झालेल्या आहेत. रितेशजवळ सध्या तीन प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे चित्रपटासाठी आवश्यक असलेले दोन प्रमोशनल गाणी शूट करण्याचाही वेळ नाही. चित्रपट आॅगस्टमध्ये प्रदर्शित करायचा आहे. चित्रपटाची शूटिंग मार्चमध्येच पूर्ण झाली होती. रितेशला मात्र पुढील महिन्याअगोदर वेळ मिळणार नाही.