करीना कपूरने बदलले तैमूरचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 09:13 IST2017-02-28T09:07:38+5:302017-02-28T09:13:18+5:30
करीनाने 'तैमूर'ला त्याच्या नावाने हाक मारणं बंद केले आहे म्हणे. करीनाने 'तैमूर'चे एक गोंडस नाव ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

करीना कपूरने बदलले तैमूरचे नाव
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा 'तैमूर'चे नाव त्याच्या जन्मदिवसापासून वादात अडकले आहे. टीकेचा भडीमार होत असतानाही मुलाचे नाव बदलायचे नाही यावर दोघंही सुरुवातीपासून ठाम होते. पण आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, खुद्द करीनानेच 'तैमूर'ला त्याच्या नावाने हाक मारणं बंद केले आहे म्हणे. करीनाने 'तैमूर'चे एक गोंडस टोपण नाव ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना करीनाने सांगितले की, ती 'तैमूर'ला 'लिटिल जॉन' या नावाने बोलावणे, त्याचा उल्लेख करणं सुरू केले आहे. दरम्यान, 'तैमूर' या नावावर बराच वाद निर्माण झाला होता. यामुळे करीना आणि सैफ दोघांवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. या वादावर प्रतिक्रिया देताना सैफने म्हटले होते की, इतिहासाबाबत कमी माहिती आहे. त्यामुळे 'तैमूर' नावाचा कुणी क्रूर राजा होता की नाही, याची माहिती नव्हती. मात्र मी त्याच्या नावावरुन माझ्या मुलाचे नाव ठेवलेले नाही. मला हे नाव खूप आवडत होते म्हणून मी माझ्या मुलाचे नाव 'तैमूर' ठेवले'.
'तैमूर' नावाहून सर्व स्तरातून टीकेचा भडीमार झाल्यानंतरही मुलाचे नाव बदलायचे नाही यावर करीना-सैफ ठाम होते. मात्र काही दिवसांपूर्वी मुलाचे नाव बदलण्याच्या विचारत असल्याचे सैफने एक मुलाखतीत म्हटले होते. 'भविष्यात तैमूरला कोणत्याही अडचणींना सामोरं जावे लागू नये. तसेच या नावामुळे त्याचा द्वेष अथवा बदनामी व्हावी, अशी माझी इच्छा नाही', या भीतीपोटी सैफने तैमूरचे नाव बदलण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते.
सैफच्या या निर्णयाला त्यावेळी करीनाने विरोध दर्शवला होता. 'लोकं आपल्यासोबत आहेत, आपल्या विचारांमुळे लोकं आपला आदर करतात, त्यामुळे आता माघार घेणे योग्य नाही', असे त्यावेळी करीनाचे म्हणणे होते. मात्र आता स्वतः करीना मुलाला 'तैमूर' नावाऐवजी लिटिल जॉन या नावाने हाक मारते, अशी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.