कपिलला आणखी एका चित्रपटाची ऑफर

By Admin | Updated: July 20, 2014 00:17 IST2014-07-20T00:17:09+5:302014-07-20T00:17:09+5:30

सस्पेंस थ्रिलर चित्रपटांचे लोकप्रिय निर्माते अब्बास मस्तान या जोडीने टीव्हीवरील कॉमेडी किंग कपिल शर्माला एक चित्रपट ऑफर केल्याची बातमी आहे.

Kapila offers another movie | कपिलला आणखी एका चित्रपटाची ऑफर

कपिलला आणखी एका चित्रपटाची ऑफर

सस्पेंस थ्रिलर चित्रपटांचे लोकप्रिय निर्माते अब्बास मस्तान या जोडीने टीव्हीवरील कॉमेडी किंग कपिल शर्माला एक चित्रपट ऑफर केल्याची बातमी आहे. हा चित्रपट अर्थातच कॉमेडी असणार असून ती गोविंदा स्टाईल कॉमेडी असेल, असे सांगण्यात येत आहे. चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. चित्रपटात कपिलसोबत पाच हिरोईन असणार आहेत. कपिलने अद्याप याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अब्बास यांनी सांगितले की, ‘कपिलसोबत आमच्या अनेक मिटिंग्ज झाल्या आहेत. सर्व ठीक आहे. सध्या तो भारताबाहेर आहे; पण परत येताच डील फायनल होईल. आम्हालाही अॅक्शन थ्रिलरऐवजी इतरही चित्रपट बनवायचे आहेत. कपिलसोबत आम्ही कॉमेडीची इनिंग सुरू करीत आहोत.’
 

 

Web Title: Kapila offers another movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.