जोयाच्या चित्रपटात रिद्धिमा
By Admin | Updated: June 25, 2014 00:40 IST2014-06-25T00:35:02+5:302014-06-25T00:40:54+5:30
सध्या अनेक नवे चेहरे बॉलीवूडमध्ये लाँच झाले आहेत. याच यादीत आता रिद्धिमा सुद हे नवे नावही सहभागी होत आहे.

जोयाच्या चित्रपटात रिद्धिमा
शिरीष नाईक ल्ल कसई दोडामार्ग
तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त तालुकावासीयांनी महालक्ष्मी कंपनीची वीज तालुक्याला द्यावी व दोडामार्ग ते इन्सुली येथून पर्यायी लाईन टाकावी, अशी मागणी केली होती. मात्र, या दोन्ही मागण्या अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने तालुकावासीयांना अंधारात रहावे लागत आहे.
दोडामार्ग तालुका दुर्गम असल्याने या तालुक्याकडे वीज कंपनीचा दुर्लक्ष होत आहे. इन्सुली येथून दोडामार्गपर्यंत टाकलेल्या वीजवाहिनीद्वारे तालुक्याला वीज पुरवठा केला जातो. ही लाईन डोंगर भागातून आली असून फार जुनी आणि जीर्ण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात झाड अथवा फांदी वाहिनीवर कोसळणे आणि इतर कारणांमुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. जंगलभागातून वीजवाहिनी गेल्याने दोष शोधेपर्यंत नाकीनऊ येतात आणि तालुकावासीयांना अंधारात रहावे लागते. त्यामुळे या वाहिनीला पर्यायी वाहिनी टाकण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. यासाठी आंदोलनही छेडण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन संंबंधित विभागाने दिले होते. महालक्ष्मीची वीज या वाहिनीला पर्याय ठरत असल्याने वीज जोडणीचे काम सुरू करून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे इन्सुली येथून वीजपुरवठा खंडित झाला, तरी तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत राहील, अशी माहिती वीज कंपनीकडून देण्यात आली होती.
परंतु महालक्ष्मीमधून होणारे वीजपुरवठ्याचे काम सध्या बंद आहे. अंतर्गत मशिनरीची दुरुस्ती सुरू असल्याने वीजपुरवठा सध्या बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर वीज कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत असून तालुक्यात वीजपुरवठा खंडित होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीमध्ये विसंगती असल्याने सध्या तालुकावासीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तिराळी धरणात पाण्याची पातळी कमी झाल्याने वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणी पुरवठ्याच्या अभावी वीज पुरवठा काम बंद असल्याचीही माहिती मिळत आहे. परंतु याला महालक्ष्मी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी होकार दिलेला नाही. एकंदरीत दोन्ही पर्यायी मार्ग बंद असल्याने तालुक्यात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. पर्यायी वाहिनीमुळे वीजपुरवठा आता खंडित होणार नाही, अशी आशा तालुकावासीयांना होती. पर्यायी वाहिनी टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले. परंतु काही ठिकाणी जमीनमालकांनी खांब टाकण्यास विरोध केल्याने काम सध्या बंदावस्थेत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वीज अधिकाऱ्यांची गोची झाली असून ग्रामस्थांच्याही रोषास सामोरे जावे लागत आहे.