जॅकलीन बनली‘वूमन आॅफ द ईअर’
By Admin | Updated: December 19, 2014 22:41 IST2014-12-19T22:41:36+5:302014-12-19T22:41:36+5:30
अभिनेत्री म्हणून जॅकलीन फर्नांडीसने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जॅकलीन सामाजिक कार्यांमध्येही आघाडीवर आहे

जॅकलीन बनली‘वूमन आॅफ द ईअर’
अभिनेत्री म्हणून जॅकलीन फर्नांडीसने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जॅकलीन सामाजिक कार्यांमध्येही आघाडीवर आहे. प्राण्यांच्या संरक्षणासाठी जॅकलीन काम करीत असते. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल जॅकलीन फर्नांडीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश केएसपी राधाकृष्णन यांना पेटा इंडियाच्या वतीने ‘पीपल आॅफ द ईअर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पेटा या अमेरिकन संघटनेने जॅकलीनला ‘वूमन आॅफ द ईअर’ आणि न्यायमूर्ती केएसपी राधाकृष्णन यांना ‘मॅन आॅफ द ईअर’ पुरस्कार दिला आहे.