येतोय इमरान-कंगनाचा उंगली
By Admin | Updated: June 20, 2014 11:08 IST2014-06-20T11:08:13+5:302014-06-20T11:08:13+5:30
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या ‘उंगली’ या चित्रपटाची रिलीज डेट आता निश्चित झाली आहे. इमरान आणि कंगना राणावतचा हा चित्रपट २१ नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

येतोय इमरान-कंगनाचा उंगली
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या ‘उंगली’ या चित्रपटाची रिलीज डेट आता निश्चित झाली आहे. इमरान आणि कंगना राणावतचा हा चित्रपट २१ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. उंगलीचे दिग्दर्शन रेसिंल डिसिल्वा यांनी केले आहे. चित्रपटात इमरान आणि कंगनासह संजय दत्त, रणदीप हुड्डा, नेहा धुपिया आणि नील भूपालम् यांच्याही भूमिका आहेत. रेसिंल यांनी सांगितले की, ‘चित्रपट मल्टीस्टारर आहे, प्रत्येक कलाकाराच्या डेटस् मॅच करणे अवघड होते. जेव्हा या डेटस् मॅच झाल्या तेव्हा संजय दत्तला तुरुंगवास झाला. त्यामुळे चित्रपटाचे शेड्युल्ड कोलमडले; पण आता चित्रपट तयार आहे. ’