घटस्फोटाच्या सुनावणीसाठी हृतिककडे वेळ नाही
By Admin | Updated: October 31, 2014 00:09 IST2014-10-31T00:09:34+5:302014-10-31T00:09:34+5:30
हृतिक रोशन आणि सुजैन खान यांच्या घटस्फोटावर शुक्रवारी म्हणजेच 31 ऑक्टोबरला सुनावणी होत आहे; पण या सुनावणीला हृतिक रोशन हजर राहू शकणार नाही.

घटस्फोटाच्या सुनावणीसाठी हृतिककडे वेळ नाही
हृतिक रोशन आणि सुजैन खान यांच्या घटस्फोटावर शुक्रवारी म्हणजेच 31 ऑक्टोबरला सुनावणी होत आहे; पण या सुनावणीला हृतिक रोशन हजर राहू शकणार नाही. हृतिकच्या वकिलांनी सांगितले की, ‘आम्ही स्वत: कोर्टात सादर करू शकणार नाही. कारण हे सुविधाजनक नाही. आम्ही सुनावणीसाठी दुसरी तारीख निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.’ या तारखांत बदल का हवा आहे, याचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. कदाचित हृतिक आणि सुजैन यांना त्यांच्यातील काही व्यक्तिगत मुद्दे सोडविण्यासाठी वेळ हवा असेल. या वर्षाच्या सुरुवातीला सुजैन हृतिकचे घर सोडून तिच्या वडिलांच्या घरी निघून गेली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता.