खुश आहेत अनुपम खेर
By Admin | Updated: July 5, 2014 22:14 IST2014-07-05T22:14:31+5:302014-07-05T22:14:31+5:30
बॉलीवूडचे प्रसिद्ध चरित्र अभिनेता अनुपम खेर सध्या राजश्री प्रोडक्शनच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत.

खुश आहेत अनुपम खेर
बॉलीवूडचे प्रसिद्ध चरित्र अभिनेता अनुपम खेर सध्या राजश्री प्रोडक्शनच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच सुरू झाले आहे. राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटात काम करणो म्हणजे घरी परतण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी याच बॅनरच्या हम आपके है कौन, विवाह अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी टि¦ट केले की, ‘प्रेम रतन धन पायो’च्या शूटिंगचा पहिला दिवस. राजश्री प्रोडक्शनसोबत काम करणो म्हणजे घरी परत येण्यासारखे आहे.’ या चित्रपटात सलमान खान, सोनम कपूर, नील नितीन मुकेश, स्वरा भास्कर, अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत.