सरला येवलेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

By Admin | Updated: January 2, 2016 08:36 IST2016-01-02T08:36:29+5:302016-01-02T08:36:29+5:30

ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’सह विविध चित्रपटांमध्ये अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सरला येवलेकर यांना दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक ट्रस्टच्या

Gala Gaurav award for Sarla Yevlakar | सरला येवलेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

सरला येवलेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’सह विविध चित्रपटांमध्ये अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सरला येवलेकर यांना दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आणि किरण शांताराम यांच्या उपस्थितीत ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचादेखील सत्कार करण्यात आला. ‘कँडल मार्च’ला ‘उत्कृष्ट चित्रपटाने गौरविण्यात आले, तर अंकुश चौधरी आणि सुमित राघवन यांना उत्कृष्ट अभिनेता, तर सोनाली कुलकर्णी (सीनिअर) हिला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मकरंद अनासपुरे, वर्षा उसगावकर, प्रार्थना बेहरे, आरोह वेलणकर, पुष्कर श्रोत्री, उषा नाईक, शरद केळकर, जान्हवी प्रभू
अरोरा, श्रीकांत बोजेवार, गुरू ठाकूर, अजय-अतुल, प्रसाद
भेंडे आणि उमेश जाधव यांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच ‘श्रमश्रेय’ पुरस्कार अरुण पिल्लई, बाळू कांबळे, मधुकर चौगले, विलास सलोखे आणि स्पॉटदादा
बाळासाहेब यांना देण्यात आला. डान्स शो आणि विनोदी स्किट्सने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांनी केले.

Web Title: Gala Gaurav award for Sarla Yevlakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.