मराठी चित्रपटांचे भवितव्य!

By Admin | Updated: May 1, 2015 02:14 IST2015-05-01T02:14:55+5:302015-05-01T02:14:55+5:30

मराठी चित्रपटांची ही सगळी बाजू न्याय्य असूनही लढावे लागते आहे, हीच मराठीची मोठी शोकांतिका आहे.

Future of Marathi films! | मराठी चित्रपटांचे भवितव्य!

मराठी चित्रपटांचे भवितव्य!

मराठी चित्रपटांची ही सगळी बाजू न्याय्य असूनही लढावे लागते आहे, हीच मराठीची मोठी शोकांतिका आहे. वनवासातून बाहेर पडणाऱ्या मराठी सिनेसृष्टीला तिच्या मारेकऱ्यांपासून वाचविण्यासाठी तिच्या पहारेकऱ्यांना केवळ दुसऱ्याला शिव्या घालण्याबरोबरच स्वत: आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे. त्याचबरोबर सरकारनेही खंबीर पाठीराख्याची भूमिका घेण्याची आणि मराठी प्रेक्षकांनी मराठी बाणा दाखविण्याची खरी गरज आहे.

राठी चित्रपटांनी कात टाकली असून सध्या आश्वासक चित्र दिसते आहे. मराठी सिनेमांमध्ये प्रयोग होत आहेत का? तर होत आहेत. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि जे
प्रयोग आहेत, ते केवळ विषयांच्या
बाबतीत. सादरीकरणाबाबत आपण अजूनही जुन्या साच्यात अडकून पडलोत.
मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग हा मध्यमवर्गीय, मध्यमवयीन, कौटुंबिक प्रेक्षकवर्ग
असल्याचे मानले जाते. आजवर मराठी चित्रपटसृष्टी याच प्रेक्षकवर्गाच्या पाठिंब्यावर टिकून आहे.
पण आता हिंदी चित्रपटसृष्टीसाठी काही सोयी-सुविधा उपलब्ध केल्या
जातात, त्याप्रमाणे शासनाने मराठी सिनेसृष्टीसाठी सकारात्मक पाऊले उचलण्याची गरज आहे.
चित्रपट तयार करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि त्यातही मराठीसाठी विशेष तरतूद असली पाहिजे. तालुका पातळीवर सिनेमागृहांची संख्या अत्यंत अल्प आहे, त्यामुळे तेथे शासनाकडून जशी नाट्यगृहे बांधली जातात. त्याप्रमाणे छोटेखानी सिनेमागृहे बांधली पाहिजेत.
शासनाच्या सांस्कृतिक विभागाने मराठी सिनेमांचे १२० प्रयोग लावण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मराठीची गळचेपी होत होती. या निर्णयामुळे सिनेमागृहांना चुकीच्या सवलती मिळत होत्या. नुकत्याच ‘प्राइम टाइम’च्या मुद्द्यावरून रंगलेला वाद ही अक्षरश: किरकोळ गोष्ट आहे. यापूर्वी कोणतीही वेळ दिली जायची, त्यावेळी कोणीच आवाज उठविलेला नाही. त्यामुळे मराठीसाठी प्राइम टाइम ठेवण्यापेक्षा ‘सिनेमागृहे’च राखून ठेवली पाहिजेत. पायरसी रोखण्यासाठी जागतिक पातळीवर जे प्रयत्न होत आहेत त्यांचा धांडोळा घेतला पाहिजे.
हिंदी सिनेसृष्टीतील मराठीकडे वळणारे दिग्गज हे केवळ खिसे भरण्यासाठी या इंडस्ट्रीकडे वळत आहेत. कमी बजेटमध्ये सिनेमा काढून त्याचा करोडोंमध्ये येणाऱ्या मोबदल्याने आपला गल्ला भरण्यासाठी ही मंडळी मराठीकडे येत आहे. त्यात मराठीचे प्रेम, सिनेमाविषयी आस्था नसून केवळ व्यावसायिक दृष्टिकोन आहे. आपल्याकडे सिनेमासंस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. (शब्दांकन : स्नेहा मोरे)

मराठी सिनेसृष्टीसाठी शासनाने काही धाडसी बदल करणे अपेक्षित आहे, त्यातील काही प्रयोग फसतीलही. मात्र सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक पोषणही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे समाजात प्रबोधन होते. मराठी चित्रपटांचे मोजमाप मिळालेल्या पुरस्कारांच्या माध्यमातून करणे चुकीचे ठरेल. वेगळा विचार करणारी तरुणपिढी मराठीत आली आणि त्यांनी मराठीतलं साचलेपण घालवून टाकले आहे.

- गिरीश कुलकर्णी

Web Title: Future of Marathi films!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.