पहिल्या दोन दिवसात 'वझीर'ने कमावले १२.७३ कोटी
By Admin | Updated: January 10, 2016 17:34 IST2016-01-10T17:24:40+5:302016-01-10T17:34:09+5:30
फरहान अख्तर आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'वजीर' चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली असली तरी, पहिल्या दिवशी या चित्रपटाने सरासरी कमाई केली.

पहिल्या दोन दिवसात 'वझीर'ने कमावले १२.७३ कोटी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - फरहान अख्तर आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'वजीर' चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली असली तरी, पहिल्या दिवशी या चित्रपटाने सरासरी कमाई केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ५.५७ कोटीचा गल्ला गोळा केला, दुस-या दिवशी या चित्रपटाने ७.१६ कोटी कमावले.
प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसात वझीरने १२.७३ कोटींची कमाई केली आहे. 'वजीर' २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला पहिलाच मोठा चित्रपट आहे. अमिताभ बच्चन, फरहान अख्तर आणि आदिती राव हैदरीच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
मुंबई, पुणे, एनसीआर आणि उत्तरप्रदेशमध्ये वजीरने चांगली कमाई केली. २२ जानेवारीपर्यंत दुसरा कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्यामुळे 'वजीर' च्या कमाईमध्ये अधिक वाढ होणार आहे. फरहान आणि अमिताभच्या अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. बिजॉय नाम्बियारने दिग्दर्शित केलेल्या वजीर यावर्षी आठ जानेवारीला प्रदर्शित झाला.
#Wazir biz jumps on Sat. 28.55% growth from Fri to Sat. Fri 5.57 cr, Sat 7.16 cr. Total: ₹ 12.73 cr. India biz.— taran adarsh (@taran_adarsh) January 10, 2016
#Wazir shows upward trend in intl markets too. 2-day total: ₹ 7.36 cr... USA+Canada 55% growth, UK 73% growth, Singapore 83% growth.— taran adarsh (@taran_adarsh) January 10, 2016