लहानग्यांसाठी चित्रपट क्लब!

By Admin | Updated: February 28, 2017 02:31 IST2017-02-28T02:31:20+5:302017-02-28T02:31:20+5:30

मुलांना चित्रपट संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि अर्भाट फिल्म्स यांनी एकत्रितपणे एक उपक्रम सुरू केला

Film Club for Kids! | लहानग्यांसाठी चित्रपट क्लब!

लहानग्यांसाठी चित्रपट क्लब!


मुंबई : मुलांना चित्रपट संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि अर्भाट फिल्म्स यांनी एकत्रितपणे एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत एक विशेष चित्रपट क्लब सुरू करण्यात आला आहे. दर महिन्याला चित्रपट प्रदर्शनाद्वारे मुलांना चित्रपटसृष्टीचा वारसा परिचित करून देणे हे या नव्या चित्रपट क्लबचे उद्दिष्ट आहे.
हा क्लब ९ ते १६ वयोगटातील मुलांसाठी आहे़ चित्रपटाचे प्रदर्शन महिन्यातून एकदा शनिवारी किंवा रविवारी केले जाणार आहे. ज्येष्ठ चित्रपटकर्मी सत्यजित रे यांच्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘सोनार केल्ला’ या चित्रपटाने या क्लबमधील पहिल्या चित्रपटाचे प्रदर्शन केले जाणार आहे. कोथरूड येथील एनएफएआय येथे २५ फेब्रुवारी रोजी रविवारी सायंकाळी या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले.
मुलांना अभिजात चित्रपटांचा खजिना अनुभवण्यास मिळावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आनंद होत असून, या उपक्रमाद्वारे लहान वयातच चित्रपट संस्कृतीचा प्रसार होण्यास मदत होईल, असा विश्वास एनएफएआयचे संचालक प्रकाश मुगदम यांनी व्यक्त केला. विविध शाळांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठीही आमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Film Club for Kids!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.