दाऊदच्या बहिणीच्या लूकमध्ये श्रद्धा..
By Admin | Updated: February 8, 2017 03:37 IST2017-02-08T03:37:22+5:302017-02-08T03:37:22+5:30
श्रद्धा कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण (अर्थात सिनेमात) बनणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर या चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट झाला

दाऊदच्या बहिणीच्या लूकमध्ये श्रद्धा..
श्रद्धा कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण (अर्थात सिनेमात) बनणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर या चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट झाला. श्रद्धाने ‘हसीना द क्वीन आॅफ मुंबई’ या तिच्या आगामी चित्रपटातील तिचा लूक आऊट झालाय. या पोस्टरवर डोळ्यांत ‘सुरमा’ लावलेली गंभीर मुद्रेतील श्रद्धा दिसते आहे. हीच का ती ग्लॅमरस रोल करणारी श्रद्धा ? असा सवाल हे पोस्टर पाहून कुण्याच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही. ‘हसीना द क्वीन आॅफ मुंबई’ हा चित्रपट दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे. या बायोपिकमध्ये श्रद्धा साकारणार असलेली व्यक्तिरेखा १७ ते ४० वर्षे वयोगटातील असणार आहे. निश्चितपणे यासाठी श्रद्धाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. अलीकडे एका मुलाखतीदरम्यान खुद्द श्रद्धाने हसीना पारकरची व्यक्तिरेखा साकारणे तिच्यासाठी एक आव्हान असल्याचे म्हटले होते. या भूमिकेला अधिकाधिक जिवंत करण्याचे माझे प्रयत्न आहेत. मी यासाठी अपार मेहनत घेतेय, असे श्रद्धा कपूर म्हणाली.