‘बॉम्बे वेलवेट’च्या अपयशामुळे धक्का बसला
By Admin | Updated: September 4, 2015 23:21 IST2015-09-04T23:21:28+5:302015-09-04T23:21:28+5:30
अनुष्का शर्मा हिने अल्पावधीत बॉलीवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केले आहे. कमीत कमी चित्रपटांच्या जास्तीत जास्त यशामुळे तिला केवळ यशाचीच सवय जडली आहे.

‘बॉम्बे वेलवेट’च्या अपयशामुळे धक्का बसला
अनुष्का शर्मा हिने अल्पावधीत बॉलीवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केले आहे. कमीत कमी चित्रपटांच्या जास्तीत जास्त यशामुळे तिला केवळ यशाचीच सवय जडली आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, की मी कधीही फ्लॉप चित्रपट केला नाही. मी प्रथमच असे बोलत आहे, की मला यापूर्वी कधीही अपयश माहीत नव्हते. ‘बॉम्बे वेल्वेट’बद्दल काय झाले मला समजत नाहीये. पण असे वाटते आहे, की घरात कुणाचा तरी मृत्यू झाला आहे आणि सगळीकडे दु:खद वातावरण आहे. मी काही खूप चित्रपट केले नाहीत, पण जे केले ते यशस्वी ठरले आहेत. मात्र बॉम्बे वेल्वेट चित्रपटात मी अतिशय गुंतले होते. शूटिंगवरही मी मेहनत घेतली. चित्रपट पैसा कमावू शकला नाही, हे फारच दुर्दैवी ठरले.