‘मनातल्या उन्हा’वर विदेशी मोहर
By Admin | Updated: August 5, 2015 00:48 IST2015-08-05T00:48:06+5:302015-08-05T00:48:06+5:30
मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत ते वेगळ्या धाटणीचे विषय अतिशय सुंदर पद्धतीने हाताळल्यमुळे. गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपटांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

‘मनातल्या उन्हा’वर विदेशी मोहर
मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत ते वेगळ्या धाटणीचे विषय अतिशय सुंदर पद्धतीने हाताळल्यमुळे. गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपटांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरही अॅवॉर्ड मिळवून मराठी चित्रपटांचा झेंडा अटकेपार रोवला आहे. श्वास, कोर्ट, बायोस्कोप अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घ्यायला भाग पाडलेल्या चित्रपटांच्या यादीत दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांच्या ‘मनातल्या उन्हात’चेही नाव आता घेतले जाणार आहे. कॅलिफोर्नियामध्ये होणाऱ्या ‘फेस्टिव्हल आॅफ ग्लोब’मध्ये हजारो चित्रपटांतून निवडलेल्या चित्रपटांमध्ये ‘मनातल्या उन्हात’ या चित्रपटानेही स्थान मिळवले आहे.