लवकर नर्व्हस होते आलिया
By Admin | Updated: July 21, 2014 14:52 IST2014-07-21T14:51:16+5:302014-07-21T14:52:54+5:30
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने मनीष मल्होत्राच्या‘फॅशन शो’मध्ये २0 किलोंचा घागरा परिधान करून रॅम्प वॉक केला.

लवकर नर्व्हस होते आलिया
>बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने मनीष मल्होत्राच्या ‘फॅशन शो’मध्ये २0 किलोंचा घागरा परिधान करून रॅम्प वॉक केला. रॅम्प वॉक करताना आलियामध्ये भरपूर आत्मविश्वास दिसला; परंतु आलियाने सांगितले, की ती रॅम्प वॉक करताना अतिशय घाबरलेली होती. तिला असे लोकांसमोर यायला भीती वाटते. आलिया अनेकदा उभ्या उभ्याच पडते. सुंदर दिसणं, विविध पोज देणं आणि लोकांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवणं, हे वातावरण तिला अस्वस्थ करते. मात्र, हा दोन मिनिटांचा काळ तिच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ असतो, असेही ती म्हणाली. आलियाने या ‘फॅशन शो’मध्ये कमीत कमी मेकअप, अस्ताव्यस्त केस आणि कुठलेही दागिने न घालता वधूचा लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता.