’नीळकंठ मास्तर’च्या निमित्ताने पूजाचे नृत्यदिग्दर्शनात पदार्पण

By Admin | Updated: August 12, 2015 05:15 IST2015-08-12T05:15:05+5:302015-08-12T05:15:05+5:30

सक्षम अभिनेत्री म्हणून ओळख असलेली पूजा सावंत हिने ‘नीळकंठ मास्तर’ चित्रपटाच्या निमित्ताने नृत्यदिग्दर्शनात पदार्पण केले आहे. चित्रपटातील ‘अधिरं मन’ या गाण्याचे तिने दिग्दर्शक

Dronacharya's introduction to Puja on the occasion of 'Neelkanth Master' | ’नीळकंठ मास्तर’च्या निमित्ताने पूजाचे नृत्यदिग्दर्शनात पदार्पण

’नीळकंठ मास्तर’च्या निमित्ताने पूजाचे नृत्यदिग्दर्शनात पदार्पण

सक्षम अभिनेत्री म्हणून ओळख असलेली पूजा सावंत हिने ‘नीळकंठ मास्तर’ चित्रपटाच्या निमित्ताने नृत्यदिग्दर्शनात पदार्पण केले आहे. चित्रपटातील ‘अधिरं मन’ या गाण्याचे तिने दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या साथीने नृत्यदिग्दर्शन केले आहे.
स्वातंत्र्यसेनानींच्या प्रेमबंधांवर भाष्य करणारा नीळकंठ मास्तर
७ आॅगस्टला प्रदर्शित झाला आहे. एक वेगळा विषय यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. यापूर्वी स्वातंत्र्यवीरांचा संघर्ष, त्यांना करावा लागणारा त्याग याविषयीचे किस्से अनेक सिनेमांमधून आपल्यासमोर आले; मात्र या वीरांच्या प्रेमकथा नेहमीच दुर्लक्षित राहिल्या आहेत. याचं प्रेमकथांवर कोझी होम्स प्रस्तुत आणि अक्षर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘नीळकंठ मास्तर’ या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. ‘नीळकंठ मास्तर’ हा सिनेमा अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचं दिग्दर्शन, अजय-अतुल या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीचे सुमधूर संगीत, कलाकारांचा अप्रतिम अभिनय, निरनिराळ्या प्रदेशांमध्ये केलेलं नेत्रोद्दीपक छायाचित्रण या सगळ्याच पार्श्वभूमीवर हा सिनेमा वेगळा ठरतो. यातलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पूजा सावंतचं नृत्यदिग्दर्शन ठसले आहे. या गाण्यात ती आपल्याला खेळताना, बागडताना दिसते आहे. नृत्यदिग्दर्शनाबरोबरच आपल्या सुंदर अभिनयाची चुणूक पुन्हा एकदा पूजाने दाखवली आहे. एक खोडकर, खेळकर मुलगी ते मनाविरुद्ध झालेली इनामदारांची सून हा इंदू या व्यक्तिरेखेचा प्रवास पूजाने अप्रतिम साकारला आहे. इंदू म्हणून तिचा खोडकरपणा जितका मनाला भावतो तसाच इनामदारांच्या सुनेचा रूबाबही त्याच ताकदीचा वाटतो. आपण ‘नीळकंठ मास्तर’च्या निमित्ताने पहिल्यांदाच पूजाला एका गावरान मुलीच्या रूपात पाहणार आहोत. हा तिचा लूक प्रेक्षकांच्या किती पसंतीला पडतो हे येणारा काळच सांगेल.

Web Title: Dronacharya's introduction to Puja on the occasion of 'Neelkanth Master'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.