आईच्या भूमिकेची उत्कंठा
By Admin | Updated: June 9, 2014 14:52 IST2014-06-09T14:52:12+5:302014-06-09T14:52:34+5:30
अभिनेत्री स्वरा भास्कर आगामी ‘निल बट्टे सन्नाटा’ या चित्रपटात १३ वर्षीय मुलीच्या आईची भूमिका साकारत आहे. या भूमिकेबाबत स्वरा फारच उत्साहित दिसते

आईच्या भूमिकेची उत्कंठा
>अभिनेत्री स्वरा भास्कर आगामी ‘निल बट्टे सन्नाटा’ या चित्रपटात १३ वर्षीय मुलीच्या आईची भूमिका साकारत आहे. या भूमिकेबाबत स्वरा फारच उत्साहित दिसते. या भूमिकेबाबत बोलताना स्वराने सांगितले की, ‘ही भूमिका माझ्यासाठी फार आव्हानात्मक आहे. कारण या चित्रपटात मी अशा महिलेची भूमिका साकारत आहे जी माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे. अशी भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हानच होते; परंतु केवळ आईची भूमिका असल्याने भीतीपोटी मी हा चित्रपट नाकारू इच्छित नव्हते. एक आव्हान म्हणून मी हा चित्रपट स्वीकारला.