सायनाच्या भूमिकेत दीपिका
By Admin | Updated: July 25, 2014 22:50 IST2014-07-25T22:50:16+5:302014-07-25T22:50:16+5:30
स ध्या स्टार खेळाडूंवर बायोपिक बनवण्याची लाट बॉलीवूडमध्ये आली आहे. मागील वर्षी मिल्खा सिंह यांच्या जीवनावरील ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट रिलीज झाला होता.

सायनाच्या भूमिकेत दीपिका
स ध्या स्टार खेळाडूंवर बायोपिक बनवण्याची लाट बॉलीवूडमध्ये आली आहे. मागील वर्षी मिल्खा सिंह यांच्या जीवनावरील ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट रिलीज झाला होता. लवकरच मेरी कॉमच्या जीवनावर आधारित ‘मेरी कॉम’ हा चित्रपट रिलीज होत आहे. तसेच पानसिंह तोमर, चक दे इंडियासारखे चित्रपटही याच प्रकारातले आहेत. आता महेश भट्टही या प्रवाहात सामील होत आहेत. बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर एक चित्रपट बनवण्याची त्यांची तयारी आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोन मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. बॅडमिंटन लिजेंड प्रकाश पदुकोन यांची मुलगी असलेली दीपिका स्वत: एक बॅडमिंटनपटू आहे. तीच या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल, असे भट्ट यांना वाटते. सायनाच्या मते दीपिकाने तिची भूमिका केली तर तिला आनंदच होईल, ती या भूमिकेला न्याय देऊ शकेल. सायनाची भूमिका निभावण्याचा प्रस्ताव आल्यास तो नक्की स्वीकारेल, असे दीपिका म्हणाली.