रणबीर दीपिकाची तमाशात भटकंती
By Admin | Updated: August 9, 2014 23:42 IST2014-08-09T23:42:52+5:302014-08-09T23:42:52+5:30
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांची जोडी पडद्यावर अतिशय चांगली दिसते. ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातून त्याचा प्रत्यय आला आहे.

रणबीर दीपिकाची तमाशात भटकंती
>रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांची जोडी पडद्यावर अतिशय चांगली दिसते. ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातून त्याचा प्रत्यय आला आहे. ही जोडी पुन्हा एकदा इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ या चित्रपटात दिसणार आहे. रणबीर दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगली आहेच; पण ख:या आयुष्यातही त्यांच्यात एक गोष्ट समान आहे ती म्हणजे, दोघांनाही भूमिकांबाबत प्रयोग करायला आवडतात. ‘तमाशा’ या चित्रपटात रणबीर भटकंती करणा:या एका तरुणाची भूमिका निभावत असून दीपिका चित्रपटात एका फ्रेंच कॉमिक्सची फॅन असल्याचे कळते. चित्रपटाच्या कथेनुसार दोघांची भेट कोर्सिकात होते. दीपिका तिच्या आवडत्या कॉमिक्सच्या एका कहाणीने प्रेरित होऊन तेथे फिरायला आलेली असते. दोघांना एकमेकांची भटकंतीची आवड समजते, तेव्हा ते सोबत प्रवासाला निघतात.