‘पिज्ज’च्या सेटवर जखमी दीपनीता
By Admin | Updated: July 5, 2014 22:12 IST2014-07-05T22:12:53+5:302014-07-05T22:12:53+5:30
‘पिज्ज थ्री डी’ या हॉरर चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री दीपनीता शर्मा जखमी झाली होती

‘पिज्ज’च्या सेटवर जखमी दीपनीता
‘पिज्ज थ्री डी’ या हॉरर चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री दीपनीता शर्मा जखमी झाली होती. चित्रपटातील काही गंभीर दृश्ये चित्रित करताना दीपनीताला एका भिंतीला लटकावे लागले. सुरक्षेसाठी तिला एका दोरीने बांधण्यात आले होते. दीपनीता हातांनी भिंतीवर चढली आणि शूटिंगसाठी पूर्ण दिवसभर तिला भिंतीलाच लटकून राहावे लागणार होते. या दृश्यासाठी तिने पांढ:या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता. काही वेळातच दीपनीताच्या खांद्यात असह्य वेदना सुरू झाल्या. त्यामुळे तिच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेली दोरी काढून टाकण्यात आली. तिच्या असह्य वेदना पाहून शेवटी दिग्दर्शकांना हे दृश्ये घाईत शूट करावे लागले. या अॅक्शन दृश्यादरम्यान दीपनीताच्या खांद्याला दुखापत झाली होती.