‘डीडीएलजे’च्या दृश्याचे ‘हे’ आहेत कॉपीबहाद्दर!

By Admin | Updated: February 11, 2017 04:10 IST2017-02-11T04:10:14+5:302017-02-11T04:10:14+5:30

बऱ्याच वेळा एखादे दृश्य गाजले, की त्याची कॉपी करण्याची बॉलिवूडमध्ये परंपरा आहे. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ या चित्रपटातील रेल्वे स्थानकावरील काजोल-शाहरुखचे दृश्य खूप गाजले

'DDLJ' are the views of 'This' is copyabhaadra! | ‘डीडीएलजे’च्या दृश्याचे ‘हे’ आहेत कॉपीबहाद्दर!

‘डीडीएलजे’च्या दृश्याचे ‘हे’ आहेत कॉपीबहाद्दर!

बऱ्याच वेळा एखादे दृश्य गाजले, की त्याची कॉपी करण्याची बॉलिवूडमध्ये परंपरा आहे. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ या चित्रपटातील रेल्वे स्थानकावरील काजोल-शाहरुखचे दृश्य खूप गाजले. याचप्रमाणे अनेक चित्रपटांत अशी दृश्ये चित्रित करण्यात आली. रणवीरसिंहने एका चित्रपटात असेच दृश्य साकारले आहे. या संदर्भात त्याने ट्विटरवर मेसेज लिहून कृपया असे प्रकार करू नयेत, अशी विनंतीही केली आहे. ‘डीडीएलजे’ चित्रपटातील हे दृश्य आणखी कोणत्या चित्रपटात साकारण्यात आले आहे, ते पाहू या...

दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे
‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे’ या चित्रपटातील शेवटच्या दृश्यात राज (शाहरुख खान) रेल्वेने जात असताना सिमरन (काजोल) वडिलांचा हात सोडून त्याच्या मागे धावते. त्या वेळी हात पुढे करून शाहरुख तिला ओढण्याचा प्रयत्न करतो. हा सीन गेली अनेक वर्षे चित्रपट रसिकांच्या मनावर कोरला गेला आहे.

चेन्नई एक्स्प्रेस
शाहरुख खानला अशी दृश्ये करणे कदाचित आवडत असावे. चेन्नई एक्स्प्रेसमध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आहे. या चित्रपटात राहुल (शाहरुख खान) हा मीना (दीपिका पदुकोण) हिला रेल्वेच्या डब्यात खेचण्याचा प्रयत्न करीत असतो. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच हे दृश्य दाखविण्यात आले आहे. ‘डीडीएलजे’प्रमाणेच हे दृश्य आहे.

जब वी मेट
इम्तियाझ अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ या चित्रपटात अशाच प्रकारचे दृश्य दाखविण्यात आले आहे. आदित्य (शाहीद कपूर) आणि गीत (करिना कपूर) हे दोघे पुन्हा एकत्र येतात, अशा आशयाचे हे दृश्य आहे. शाहीद हा रेल्वेच्या दरवाजात उभा राहून करिनाचा हात हातात घेताना दिसतो.

हाफ गर्लफ्रेंड
चेतन भगतच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी याने केले आहे. रिया (श्रद्धा कपूर) आणि माधव (अर्जुन कपूर) यांच्यात असेच एक दृश्य आहे. रेल्वे सुरू झालेली असताना रिया ही दरवाजाजवळ उभी असते. त्या वेळी धावतच माधव तिच्यासोबत येण्याचा प्रयत्न करीत असतो.

ये जवानी है दिवानी
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी ये जवानी है दिवानी या चित्रपटात हे दृश्य साकारले आहे. रणबीर हा रेल्वेच्या दरवाजात उभा राहून दीपिकाला आत खेचतो, अशा प्रकारचे हे दृश्य आहे.

Web Title: 'DDLJ' are the views of 'This' is copyabhaadra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.