प्राजक्ताला मिळाली अशीही कॉम्प्लिमेंट
By Admin | Updated: August 24, 2016 02:06 IST2016-08-24T02:06:45+5:302016-08-24T02:06:45+5:30
कलाकारांना त्यांच्या अभिनयासाठी थेट प्रेक्षकांकडून दोन कौतुकाचे शब्द ऐकायला मिळणे, ही फारच मोठी गोष्ट असते.

प्राजक्ताला मिळाली अशीही कॉम्प्लिमेंट
कलाकारांना त्यांच्या अभिनयासाठी थेट प्रेक्षकांकडून दोन कौतुकाचे शब्द ऐकायला मिळणे, ही फारच मोठी गोष्ट असते. एखादा चित्रपट हिट होणे म्हणजे आपला अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याची कलाकाराला मिळालेली पोचपावतीच असते. परंतु, नाटकामध्ये कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी असते. या वेळी चुकांना वाव नसतो आणि प्रत्येक गोष्ट ही परफेक्टच करावी लागते. प्राजक्ता माळी सध्या ‘प्लेझंट सरप्राइज’ नावाचे नाटक करते आहे. नुकतीच या नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्राजक्ताला एक अनपेक्षित तितकीच मजेशीर अशी कॉम्प्लिमेंट मिळाली. आता कॉम्प्लिमेंट म्हटल्यावर ‘तू खूप छान दिसतेस, हसतेस किंवा अभिनय करतेस’ अशा स्वरूपाची असेल, असं तुम्हाला नक्की वाटलं असणार. मात्र, तसे बिलकूलच नाहीये. एका चाहत्याने तिला चक्क ‘तू खूप छान रडतेस!’ अशी कॉम्प्लिमेंट दिली. इतकंच नाही तर ‘तुझं रडणं बघून आम्हालाही आमचे अश्रू अनावर होतात.’ असा हा मजेशीर किस्सा प्राजक्ता माळीने सीएनएक्स लोकमतशी बोलताना सांगितला. आजपर्यंतची सर्वांत छान आणि मजेशीर कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटच्या यादीत याही कॉम्प्लिमेंटचा समावेश असल्याचे प्राजक्ताने सांगितले.