‘पीके’च्या चौकशीसाठी समिती
By Admin | Updated: December 31, 2014 10:02 IST2014-12-31T01:59:54+5:302014-12-31T10:02:12+5:30
हिंदू देवतांचा अपमानाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त पीके सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यांची चौकशी केली जाणार आहे.

‘पीके’च्या चौकशीसाठी समिती
मुंबई : हिंदू देवतांचा अपमानाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त पीके सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्या नेतृत्वात समिती नेमल्याची माहिती राज्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी आज दिली.
हिंदू देवदेवता व कर्मकांडांची खिल्ली उडवतानाच अन्य धर्मीयांच्या प्रथांबाबत जाणीवपूर्वक मौन बाळगल्याचा आरोप करीत हिंदुत्ववादी संघटनांनी पीके सिनेमावर आक्षेप घेतला.
या मुद्द्यावरून चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता आमीर खान टीकेचे लक्ष्य बनले आहेत. बजरंग दल, विश्च हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी हिंसक आंदोलनेही झाली. भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी तर दुबईतील पीकेच्या प्रदर्शनासाठी पाकिस्तानी कंपनीने आर्थिक रसद पुरविल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना राम शिंदे यांनी पीकेतील आक्षेपार्ह दृश्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)