कॅट म्हणाली नो कॉम्प्रमाईज
By Admin | Updated: July 5, 2014 22:16 IST2014-07-05T22:16:34+5:302014-07-05T22:16:34+5:30
अभिनेत्री कॅटरिना कैफ तिच्या लूकबाबत नेहमीच सजग असते आणि त्यात जराही बेपरवाई केलेली तिला चालत नाही. याचा प्रत्यय नुकतेच ‘बँग बँग’च्या शूटिंगदरम्यान आला.

कॅट म्हणाली नो कॉम्प्रमाईज
अभिनेत्री कॅटरिना कैफ तिच्या लूकबाबत नेहमीच सजग असते आणि त्यात जराही बेपरवाई केलेली तिला चालत नाही. याचा प्रत्यय नुकतेच ‘बँग बँग’च्या शूटिंगदरम्यान आला. ‘बँग बँग’मधील एक गाणो शूट करण्यासाठी कॅटसाठी दोन गाऊन बनवून घेण्यात आले होते; पण ते गाऊन प्रोडक्शन हाऊसला आवडले नाही. त्यांनी दुस:या डिझायनर्सला हे गाऊन तयार करायला सांगितले. हे गाऊन सुंदर होतेच; पण त्यांची किंमतही जवळपास एक कोटींच्या घरात होती. प्रोडक्शन हाऊसने एवढा खर्च करायला नकार दिला, कारण चित्रपटाचे बजट याआधीच ओव्हर फ्लो झाले होते. कॅटरिनाला हे समजले तेव्हा तिने हे दोन्ही गाऊन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. लूकबाबत कॉम्प्रमाईज करण्याची कॅटची इच्छा नव्हती, तसेच निर्मात्यांचा खर्चही वाढवण्याचा तिचा विचार नव्हता.