ऐश्वर्या रायपासून दूर राहा अशी संजय दत्तला देण्यात आली होती धमकी, वाचा धमकी देणाऱ्याचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 18:32 IST2021-06-02T18:31:56+5:302021-06-02T18:32:40+5:30
ऐश्वर्यासोबत काम करण्याआधीच संजयला ही धमकी मिळाली होती असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

ऐश्वर्या रायपासून दूर राहा अशी संजय दत्तला देण्यात आली होती धमकी, वाचा धमकी देणाऱ्याचे नाव
ऐश्वर्या रायला सौंदर्याची खाणच म्हटले जाते. सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. संजय दत्तची बहीण नम्रता आणि प्रिया या दोघींना ऐश्वर्या इतकी आवडते की, तिच्यासाठी त्यांनी संजय दत्तला धमकी देखील दिली होती. संजय दत्तने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.
संजय दत्त आणि ऐश्वर्या यांनी शब्द, हम किसी से कम नही यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय आणि ऐश्वर्याच्या जोडीला हिट चित्रपट देता आले नसले तरी खाजगी आयुष्यात त्यांची चांगली मैत्री आहे. दोघांनी चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याआधी एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी शूट केले होते. त्यावेळेचा मजेदार किस्सा संजयने एका मुलाखतीत सांगितला होता.
Sanjay Dutt and Aishwarya Rai look GREAT together!
— Iyan Amjad (@IyanAmjad) February 28, 2016
I want them BACK onscreen! #SarbjitPosterTomorrowpic.twitter.com/KOZNFEI4LP
संजयने एका मुलाखतीत सांगितले होते की, हा १९९३ चा काळ होता. त्यावेळी ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीतील तिच्या प्रवासाला देखील सुरुवात केली नव्हती. एवढेच काय तर ती मिस वर्ल्ड देखील बनली नव्हती. पण ती एक प्रसिद्ध मॉडेल होती आणि तिच्या सौंदर्याची त्याकाळात देखील चांगलीच चर्चा होती. तिने त्यावेळी पेप्सीच्या जाहिरातीत काम केले होते. तिला पाहाताच तिच्या सौंदर्याची मी तारीफ केली होती. नम्रता आणि प्रियाला तर ऐश्वर्या प्रचंड आवडायची. त्यामुळे तिच्यासोबत फोटोशूट करण्याआधीच मला त्या दोघींनी धमकी दिली होती की, तिला पटवण्याचा विचारसुद्धा करू नकोस.... काम करताना तू तिचा नंबर घ्यायचा नाहीये की तू तिला कोणतीही भेटवस्तू देखील द्यायची नाहीये.