Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रामायण' फेम अभिनेत्याने गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर घेतलं नवीन घर, नेटकरी म्हणतात- "घर असावं तर असं!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:42 IST

'रामायण' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याने समुद्रकिनारी नवीन घर घेतलं आहे. त्यामुळे सर्वांनी त्याचं अभिनंदन केलंय

गणेशोत्सव हा सर्वांचा आवडीचा सण. या सणादरम्यान सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात सार्वजनिक मंडळांसोबतच अनेक कलाकारही आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात. अशातच इंडस्ट्रीतील एका कलाकार जोडप्याने गणेश चतुर्थीनिमित्त नवीन घरात प्रवेश केलाय. त्यामुळे सर्वांनी त्याचं अभिनंदन केलंय. हे कलाकार जोडपं आहे सरगुन मेहता आणि रवी दुबे. आगामी रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमात रवी दुबे झळकणार आहे.

कलाकार जोडप्याच्या नवीन घरी आले बाप्पा

टीव्हीवरील लोकप्रिय कलाकार जोडपं रवी दुबे आणि सरगुन मेहता यांनी नुकतेच एक आलिशान घर खरेदी केले आहे. या घराचं नाव त्यांनी 'सौभाग्य' असं ठेवलंय. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या नव्या घरात गणपती बाप्पाचे स्वागत केले. त्यांच्या या खास सेलिब्रेशनमध्ये अनेक टीव्ही कलाकार सहभागी झाले होते. गृहप्रवेशाच्या या कार्यक्रमात अभिनेत्री निया शर्मा देखील उपस्थित होती. तिने रवी आणि सरगुनच्या नव्या घराचे आणि बाप्पाच्या सजावटीचे कौतुक करत अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नियाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्या सर्वात चांगल्या मित्रांच्या, रवी आणि सरगुनच्या नव्या घरात गणपती बाप्पाचे आगमन झाल्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. हे घर खूप मस्त आहे. मी आता इथेच राहणार आहे. घरासमोर किती चांगलं दृश्य आहे. घर असावं तर असं, नाहीतर नसावं.’ या सोहळ्यात निया शर्मासोबत अर्जुन बिजलानी आणि अंकिता लोखंडे यांसारख्या कलाकारांनीही हजेरी लावली. सर्वांनी मिळून गणपतीची पूजा केली आणि डान्स करून आनंद साजरा केला.

टॅग्स :रवि दुबेरामायणबॉलिवूडसुंदर गृहनियोजनटिव्ही कलाकारटेलिव्हिजन