प्रिन्स हॅरीसोबत काय आहे प्रियांकाचे ‘कनेक्शन’?

By Admin | Updated: November 11, 2016 02:32 IST2016-11-11T02:32:56+5:302016-11-11T02:32:56+5:30

प्रियांका चोप्रा सध्या सुसाट वेगाने पळतेय. बॉलिवूड ते थेट हॉलिवूडपर्यंत मजल मारल्यानंतर प्रियांका सध्या एक आंतरराष्ट्रीय स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली आहे

Priyanka's 'connection' with Prince Harry? | प्रिन्स हॅरीसोबत काय आहे प्रियांकाचे ‘कनेक्शन’?

प्रिन्स हॅरीसोबत काय आहे प्रियांकाचे ‘कनेक्शन’?

प्रियांका चोप्रा सध्या सुसाट वेगाने पळतेय. बॉलिवूड ते थेट हॉलिवूडपर्यंत मजल मारल्यानंतर प्रियांका सध्या एक आंतरराष्ट्रीय स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. इंटरनॅशनल सेलिब्रिटींच्या यादीसोबत प्रियांकाचे ब्रिटनच्या राजघराण्यासोबतही नाते जुळले आहे. सध्या प्रियांकाचे हेच ‘रॉयल कनेक्शन’ चर्चेचा विषय ठरत आहे. आपले हॉलिवूडमधील करिअर पुढे रेटत असतानाच प्रियांकाने इथे अनेक चांगले मित्र बनवले. रॉयल फॅमिलीसोबतही प्रियांकांचे सूर जुळले आहेत. ते कसे? तर अभिनेत्री मेगन मार्कले हिच्यानिमित्ताने आता मेगन मार्कले आणि ब्रिटनची रॉयल फॅमिली, याचा काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तेच आम्ही सांगतोय. मेगन मार्कले ही ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरीची प्रेयसी आहे आणि हीच मेगन प्रियांकाची बेस्ट फ्रेन्ड बनलीयं. ‘बेवॉच’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियांकाची तिचे सहकलाकार यास्मिन अल मस्सरी, माइकल डेस्नटे आणि मेगन मार्कले यांच्याशी गट्टी जमलीय. गेल्या काही दिवसांपासून मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या प्रेमसंबंधांविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळेच प्रिन्स व मेगनच्या नात्यामुळे प्रियांकाचे नावही ब्रिटनच्या राजघराण्यासोबत जोडले गेले आहे. मेगनसोबतचे फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती मेगनसोबत चिल्ड करताना दिसतेय. एकंदर काय, तर या ना त्या निमित्ताने सतत प्रकाशझोतात राहायची कला प्रियांकाला चांगलीच साधलीय.

Web Title: Priyanka's 'connection' with Prince Harry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.