मेगास्टार ज्युनिअर एनटीआरचाअपघात झाला आहे. जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अभिनेत्याच्या टीमने स्टेटमेंट जारी करत ही माहिती दिली. तसंच त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा 'वॉर २' सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमा फारशी कमाल दाखवू शकला नाही. प्रेक्षकांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या.
ज्युनिअर एनटीआरच्या टीमने स्टेटमेंट जारी करत लिहिले, "मिस्टर एनटीआरला आज एका जाहिरातीच्या शूटवेळी किरकोळ दुखापत झाली. यातून पूर्ण बरा होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो पुढील काही दिवस विश्रांती घेणार आहे. त्याची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचं काहीही कारण नाही. चाहते, मिडिया आणि सर्व लोकांना कोणतेही तर्क लावू नये अशी विनंती आहे."
चाहते लाडक्या अभिनेता लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. काहीच दिवसात तो पुन्हा कामाला सुरुवात करेल. ज्युनिअर एनटीआरने 'वॉर २' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यातील त्याच्या अभिनयाचं, डान्सचं खूप कौतुक झालं मात्र सिनेमा बॉक्सऑफिसवर जोरदार आपटला. सिनेमाचं बजेटच ४०० कोटी होतं. आता ज्यु एनटीआर पुन्हा कोणत्या हिंदी सिनेमात काम करणार याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.