Join us

या आठवड्यात 21 चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; तुम्ही काय पाहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 14:12 IST

एक-दोन नव्हे तर जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थ्रिलरने परिपुर्ण असे अनेक चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत.

ऑक्टोंबर महिना सिनेप्रेमींसाठी खूप मनोरंजनाचा ठरत आहे. कारण या महिन्यात अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात  रोमँटिक कथेपासून ते सस्पेन्स-थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळतील. हा आठवडा फक्त मनोरंजनाचा असणार आहे. एक-दोन नव्हे तर जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थ्रिलरने परिपुर्ण असे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये बॉलिवूड ते मराठीपासून दक्षिणेपर्यंतच्या चित्रपटांचा समावेश आहे.

 बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर एक-दोन नव्हे तर चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'धक-धक', 'गुठली लड्डू', 'अब तो सब भगवान भरोसे' आणि 'डरन छू'  हे सिनेमे रिलीज होणार आहेत. यातील काही चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

 केवळ बॉलीवूडच नाही तर चार तेलुगू थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहेत. या यादीत 'मधुरापुडी ग्रामं आने नेनू', 'तन्तिरम : च‌ॅप्टर 1 टेल्स ऑफ शिवकाशी', 'प्रेमा युद्धम'  आणि 'राक्षस काव्यम' रिलीज होणार आहेत. त्याचबरोबर या आठवड्यात मराठीत दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यामध्ये 'खालगा'  आणि 'दिल दोस्ती दीवानगी' सारखे चित्रपट आहेत.

जर तुम्हाला तामिळ आणि कन्नड चित्रपट पाहायला आवडत असतील या आठवड्यात दोन्ही भाषांमधील प्रत्येकी दोन चित्रपट येत आहेत. 'पुधू वेधम' आणि 'अक्कू' (2023) तमिळमध्ये रिलीज होत आहेत. तर कन्नडमध्ये 'कुद्दू'  आणि 'मरकास्टरा'  सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

 शिवाय,  तीन मल्याळम चित्रपट रिलीज होणार आहेत. यामध्ये लिटिल मिस रॉथर', 'इमबाम' आणि 'रानी छिथिरा मारठंडा'  यांचा समावेश आहे. हॉलिवूडमध्येही चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.  यामध्ये 'पॉ पेट्रोल: द माईटी मूव्ही', 'डंब मनी', 'फो' आणि 'द एक्सॉर्सिस्ट: बिलीव्हर' या चित्रपटांचा समावेश आहे. 

टॅग्स :सिनेमाबॉलिवूडहॉलिवूडTollywoodमराठी चित्रपट